गँगरेपने नालासोपारा हादरलं, मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली

गँगरेपने नालासोपारा हादरलं, मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंबई : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली (Nalasopara minor rape). या नराधमांनी चाकूचा धाक दाखवत तिचे अपहरण केले, त्यानंतर तिला एका इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या चार वासनांध नराधमांनी अल्पवयीन मुलीला रूममध्ये डांबून तब्बल बारा तास तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला (Nalasopara minor rape), अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या चार आरोपींपैकी तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. तीनपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. सदर घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पीडित मुलगी शनिवारी (16 नोव्हेंबर) पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास तिच्या मित्रांसोबत आचोले तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी आरोपी अमित बटला याने तिला चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने रिक्षात बसवलं. पीडित मुलीसोबत असलेल्या मित्रांनी याचा विरोध केला. मात्र, त्यांनाही आरोपींनी धमकावलं. चारही आरोपींनी पीडित मुलीला वैती वाड़ी परीसरातील मोहम्मदी बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन डांबून ठेवलं. त्यानंतर या नराधमांनी तब्बल 12 तास तिच्यावर आळी-पाळीने सामूहीक बलात्कार केला. यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान ती या आरोपींच्या तावडीतून सुटून पळ काढण्यात यशस्वी झाली आणि तिने थेट तुळींज पोलीस ठाणे गाठलं.

पोलिसांना घडलेली घटना सांगत तिने तक्रार दाखल केली. पीडितेची तक्रार दाखल होताच तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चारपैकी तीन आरोपिंना ताब्यात घेतलं. पण मुख्य आरोपी फरार असून त्याला पकडण्यासाठी एक विशेष पथक रवाना करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *