साताऱ्यात विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, दोन शिक्षकांवर पॉक्सो गुन्हा दाखल

पाचगणी शहराजवळ असणाऱ्या नामांकित कॅम्ब्रिज विद्यालयातील दोन शिक्षकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा (Teacher sexual harassment on student) दाखल करण्यात आला आहे.

Teacher sexual harassment on student, साताऱ्यात विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, दोन शिक्षकांवर पॉक्सो गुन्हा दाखल

सातारा : पाचगणी शहराजवळ असणाऱ्या नामांकित कॅम्ब्रिज विद्यालयातील दोन शिक्षकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा (Teacher sexual harassment on student) दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ करुन अत्याचार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पाचगणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पालकांकडून संबंधित शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी (Teacher sexual harassment on student) होत आहे.

साताऱ्यातील पाचगणी जवळ असणाऱ्या नामांकित कॅम्ब्रिज विद्यालयातील 11 विद्यार्थी मंगळवारी (4 फेब्रुवारी) अचानक बेपत्ता झाले होते. या सर्व मुलांना परिसरातील ग्रामस्थांनी पाचगणी परिसरात फिरत असताना पाहिले. ग्रामस्थांनी या मुलांना पकडून पाचगणी पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी पाचगणी पोलिसांनी मुलांकडे प्राथमिक चौकशी केली असता शाळा प्रशासन मारहाण करते, जेवण देत नाही, अशा तक्रारी करून पुन्हा त्या शाळेत जाणार नसल्याचे मुलांनी सांगितले.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पाचगणी पोलिसांनी त्या मुलांना सातार्‍यातील बाल निरीक्षण सुधारगृहात दाखल केले. त्यानंतर दोन दिवस सातार्‍यातील बाल कल्याण समितीने संबंधित मुलांकडे चौकशी केली असता शाळेतील काही आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या शाळेतील दोन शिक्षकांनी मुलांचा लैंगिक छळ करुन अत्याचार केल्याचे समोर आले.

या घटनेची माहिती मुलांच्या पालकांना समजताच त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित शिक्षक आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत या घटनेत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र पाचगणी शहरातील क्रेंब्रिज सारख्या नामांकित शाळेतील शिक्षकांनी असा प्रताप केल्यामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *