AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात दोन गट भिडले, सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्याने ‘फिल्मी’ राडा

वागळे इस्टेट भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज यादव आणि अमर तुसांबर यांच्या दोन गटात सोमवारी रात्री हा राडा झाला. (Thane Wagale Estate two groups Ruckus)

ठाण्यात दोन गट भिडले, सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्याने 'फिल्मी' राडा
| Updated on: May 20, 2020 | 9:39 AM
Share

ठाणे : संचारबंदी असतानाही ठाण्यात भररस्त्यात दोन गट भिडल्याने खळबळ उडाली आहे. सिगरेटचा धूर तोंडावर सोडल्याच्या वादातून वागळे इस्टेटमधील साठेनगर परिसरात सोमवारी रात्री फिल्मी स्टाईल राडा झाला. गावठी कट्टा रोखणारा आरोपी अमर तुसांबर फरार आहे. (Thane Wagale Estate two groups Ruckus)

एकमेकांवर दगडफेक करत चक्क गावठी कट्टा रोखण्याचा प्रकार यावेळी घडला. या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करुन चौघांना अटक करण्यात आली. या राड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

वागळे इस्टेट भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज यादव आणि अमर तुसांबर यांच्या दोन गटात सोमवारी रात्री हा राडा झाला. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वैभव उर्फ कान्या साळवे याने सिगारेटचा धूर सुरज यादव याच्या तोंडावर फेकला होता. त्याचा सूड घेण्यासाठी सोमवारी रात्री दोन्ही गट आमने-सामने आले.

एकमेकांवर केलेल्या दगडफेकीत सुरज यादव आणि मलकीत बबंक उर्फ पेरु हे दोन वेगवेगळ्या गटातील दोघे जखमी झाले आहेत. या दोघांसह अजय सौदा आणि अमित धारीवाल अशा चौघांना अटक केली आहे.

हेही वाचा : अंगणात खेळणाऱ्या मुलांचं भांडण, मोठ्यांचा हस्तक्षेप, सावत्र भावाची कुऱ्हाडीने हत्या

सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गावठी कट्टा रोखणाऱ्या अमरसह इतर आरोपींचा शोध सुरु आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिली. (Thane Wagale Estate two groups Ruckus)

Follow Us
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.