वडिलांच्या सांगण्यावरुन तीन भावांकडून बहिणीची हत्या

कल्याण : बहिणीच्या अनैतिक संबंधांमुळे आपली बदनामी झाली, याचा राग मनात धरुन वडिलांच्या सांगण्यावरुन तीन भावांनी बहिणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कल्याणमधील रेल्वे यार्डात मनिता यादव हिची हत्या करण्यात आली. नेमकी घटना काय आहे? अनैतिक संबंधामुळे बहिणीला सासरच्या मंडळींनी सोडून दिले. बहिणीच्या या कृत्यामुळे समाजात आपली बदनामी झाली. याचा राग काढण्यासाठी मुलीच्या …

वडिलांच्या सांगण्यावरुन तीन भावांकडून बहिणीची हत्या

कल्याण : बहिणीच्या अनैतिक संबंधांमुळे आपली बदनामी झाली, याचा राग मनात धरुन वडिलांच्या सांगण्यावरुन तीन भावांनी बहिणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कल्याणमधील रेल्वे यार्डात मनिता यादव हिची हत्या करण्यात आली.

नेमकी घटना काय आहे?

अनैतिक संबंधामुळे बहिणीला सासरच्या मंडळींनी सोडून दिले. बहिणीच्या या कृत्यामुळे समाजात आपली बदनामी झाली. याचा राग काढण्यासाठी मुलीच्या भावंडांनी मुलीला डिसेंबर महिन्यात उत्तरप्रदेशहून कल्याणला आणले. कल्याणच्या रेल्वे यार्डात मनिता यादव या महिलेची हत्या करून, महिलेचे दोघे भाऊ आणि आत्या भाऊ मृतदेह एका झाडाला लटकावून निघून गेले. तिघांचा प्रयत्न मनिताचा मृत्यू आत्महत्या दाखविण्याचा होता. मात्र मनिताच्या अंगावरील कपड्यात तिने आपल्या मोबाईलचे सीमकार्ड लपवून ठेवले होते आणि या मोबाईल सीमकार्डमुळेच मनितची ओळख पटली आणि तिच्या हत्येचं गूढ कोळशेवाडी पोलिसांनी उघड केला आहे.

या प्रकरणी मनिताचा भाऊ तीर्थराज यादवला पोलिसांनी अटक केली आहे. अजून या प्रकरणी मनिताचा लहान भाऊ पप्पू यादव, आत्याभाऊ मनोज यादव आणि उत्तर प्रदेश येथील आजमगड येथे राहणारा मनिताचे वडिलांचा शोध पोलीस घेत आहेत. मनिताचे वडील लटकू यादव याच्या बोलण्यावरुनच मनिताची हत्या करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *