कमरपट्ट्यातून सोन्याची तस्करी, तीन किलो सोन्यासह दोघांना अटक

उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्या रेल्वे जंक्शनवर दोन सोने तस्कर (UP Police arrested two gold smuggler) करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

UP Police arrested two gold smuggler, कमरपट्ट्यातून सोन्याची तस्करी, तीन किलो सोन्यासह दोघांना अटक

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या चंदोली जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय रेल्वे जंक्शनवर दोन सोने तस्करांना (UP Police arrested two gold smuggler) पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे देशाच्या पूर्वोत्तर भागातून सोनं घेऊन यूपीच्या कानपूर येथे जात होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या दोघांवर कारवाई (UP Police arrested two gold smuggler) केली. यावेळी त्यांच्याकडून तीन किलो सोनं जप्त करण्यात आले.

“महसूल विभागाच्या गुप्त पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही छापेमारी करण्यात आली आहे. सोने तस्कर गुवाहटी ते नवी दिल्ली जाणाऱ्या ट्रेन 125050 अप नॉर्थ एक्स्प्रेस, के ए 1 कोचमधून प्रवास करत होते. या दरम्यान ही छापेमारी करण्यात आली”, अशी माहिती महसूल बुद्धिमता संचलनालयचे (DRI) अधिकारी आनंद राय यांनी दिली.

“सोन्याचे तुकडे आपल्या बेल्टमध्ये (कमरपट्टा) लपवले होते. त्यांच्या टोळीतील काही लोक म्यानमारच्या रस्त्याने पूर्वोत्तर राज्यात तस्करीच्या माध्यमातून सोनं आणतात. जे देशाच्या उत्तर भागात आणून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात पोहोचवले जाते”, असंही महसूल बुद्धिमत संचलनालचने सांगितले.

या दोघांकडून तीन किलो सोने जप्त करण्यात आलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास एक कोटी 19 लाख असू शकते. या सोने तस्करी प्रकरणात कानपूरच्या अब्दुल सलमा आणि पश्चिम बंगालच्या अजीजूर रहमानला पोलिसांनी अटक केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *