अतिशय थंड डोक्याने प्लॅन करुन तुषारची हत्या, माझं मन हादरुन गेलंय : बच्चू कडू

प्रहार संघटनेचे पदाधिकारी तुषार पुंडकर यांच्यावर काल रात्री अज्ञातांनी गोळीबार करुन त्यांची हत्या केली. (Bacchu Kadu on Tushar Pundkar murder)

अतिशय थंड डोक्याने प्लॅन करुन तुषारची हत्या, माझं मन हादरुन गेलंय : बच्चू कडू

अकोला : “तुषार पुंडकर हा प्रचंड दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता होता, माझा आधार हरपला. त्याच्या हत्येने माझं मन हादरुन गेलंय”, अशी प्रतिक्रिया प्रहार संघनेचे प्रमुख आणि जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu on Tushar Pundkar murder) यांनी दिली. प्रहार संघटनेचे पदाधिकारी तुषार पुंडकर यांच्यावर काल रात्री अज्ञातांनी गोळीबार करुन त्यांची हत्या केली. गोळीबारात जखमी झालेल्या तुषार पुंडकर (Bacchu Kadu on Tushar Pundkar murder) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तुषार पुंडकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी खुद्द बच्चू कडू हे आज सकाळीच अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये आले होते. “तुषार पुंडकरने 2 वर्षात 20 वर्षाचं काम केलं. मात्र अतिशय थंड डोक्याने प्लॅन करुन, सुपारी देऊन त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या सराईत गुन्हेगाराने केली. प्रचंड दूरदृष्टी असलेला हा माझा कार्यकर्ता होता. त्याच्या जाण्याने माझा आधार हरपला. माझं मन हादरुन गेलंय”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या तपासासाठी 15 जणांची टीम  केली आहे. 15 ते 20 दिवसात मारेकरी पकडले जातील, असा विश्वासही बचू कडू यांनी व्यक्त केला.

तुषार पुंडकर यांची हत्या

अकोल्याचे प्रहार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर  काल रात्री 10.30 च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत हल्ला केला. अकोट शहरातील पोलीस कार्टरजवळ झालेल्या या गोळीबारात तुषार पुंडकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री 2.51 च्या सुमारासास त्यांचा मृत्यू झाला.  त्यांच्यावर आज दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

तुषार पुंडकर यांच्यावर  हल्ला झाल्याचं समजताच राज्यमंत्री बच्चू कडू हे अकोटकडे रवाना झाले. त्यांनी आज रुग्णालयात जाऊन पुंडकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. पुंडकर यांच्यावर हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या गोळीबाराचा तपास अकोट पोलिसांकडून सुरु (tushar pundkar Died) आहे.

कोण आहेत तुषार पुंडकर? 

  • तुषार पुंडकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षातील अकोल्याच्या जिल्हाध्यक्षपदी काम केले.
  • बच्चू कडू यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
  • तुषार पुंडकर हे प्रहार जनशक्तीचे धडाडीचे कार्यकर्ते होते.
  • काही वर्षांपूर्वी  बच्चू कडू यांना नागपूरमध्ये एका व्यक्तीने धमकी दिली होती. त्यावेळी पुंडकर यांनी नागपूरमध्ये जाऊन धमकी देणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली होती. त्यानंतर ते बच्चू कडू यांच्या संपर्कात आले.
  • बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर पुंडकर यांना अकोल्याच्या जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं.
  • तुषार पुंडकर हे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पदाधिकारीही होते.
  • त्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आणि जिल्हाध्यक्ष म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *