CBSE 2023 Results: सत्तासंघर्षाचा निकाल लागला, पुढचा CBSE बोर्डाचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा?

CBSE 10th 12th Results 2023: यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या सीबीएसई बोर्ड निकाल 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापैकी दहावीसाठी 21 लाख 86 हजार 940 तर बारावीसाठी 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी बसले होते. एका बनावट नोटिशीमुळे यंदा CBSE बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची झोप उडाली

CBSE 2023 Results: सत्तासंघर्षाचा निकाल लागला, पुढचा CBSE बोर्डाचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा?
CBSE 2023 10th 12th result how to check
| Updated on: May 11, 2023 | 1:50 PM

नवी दिल्ली: मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल 10 मे पर्यंत जाहीर असं सांगण्यात आलं होतं. मात्र, निकालाच्या तारखेबाबत बोर्डाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. CBSE बोर्ड – @cbseindia12 च्या अधिकृत ट्विटर हँडलवर निकालाच्या तारखांबाबत नोटीस जारी केली जाईल. यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या सीबीएसई बोर्ड निकाल 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापैकी दहावीसाठी 21 लाख 86 हजार 940 तर बारावीसाठी 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी बसले होते. एका बनावट नोटिशीमुळे यंदा CBSE बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची झोप उडाली.

सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना उत्तर देताना विद्यार्थ्यांनी बोर्डाने CBSE दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करावी, जेणेकरून अशा खोट्या माहिती किंवा वेळेवर दावा करणाऱ्या बातम्यांवर बंदी घालावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. निकाल तर जेव्हा लागायचा तेव्हा लागणारच आहे. पण तो निकाल तुम्ही कसा आणि कुठे तपासू शकता त्याविषयी जाणून घेऊया.

CBSE बोर्डाचा निकाल कुठे पाहायचा?

  1. अधिकृत वेबसाइट cbse.gov.in विद्यार्थी त्यांचे सीबीएसई बोर्डाचे निकाल अनेक प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
  2. विद्यार्थी CBSE दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका अधिकृत वेबसाइट्स, परीक्षा संगम, उमंग ॲप, डिजिलॉकर ॲप, SMS आणि IVRS प्रणालीद्वारे तपासू शकतात.
  3. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेकडून त्यांच्या मूळ गुणपत्रिका मिळतील. Digilocker ने CBSE बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी लिंक ॲक्टिव्हेट केली आहे.
  4. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – cbseservices.digilocker.gov.in भेट देऊन निकाल पाहू शकतात