AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Tele Counselling: सीबीएसईचा विद्यार्थी पालकांसाठी मोठा निर्णय, मानसिक आधार देण्याचा प्रयत्न

सीबीएसईनं दोस्त फॉर लाईफ अ‌ॅप नंतर विद्यार्थ्यांसाठ टेली काऊन्सलिंग हेल्पलाईन सुरु केली आहे. CBSE Tele counselling

CBSE Tele Counselling: सीबीएसईचा विद्यार्थी पालकांसाठी मोठा निर्णय, मानसिक आधार देण्याचा प्रयत्न
सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर, अशी डाऊनलोड करा मार्कशीट
| Updated on: May 27, 2021 | 7:34 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसईनं दोस्त फॉर लाईफ अ‌ॅप नंतर विद्यार्थ्यांसाठ टेले काऊन्सलिंग हेल्पलाईन सुरु केली आहे. सीबीएसईनं सलग 24 व्यावर्षी हेल्पलाईन सुरु केली आहे. ही हेल्पलाईन विद्यार्थी आणि पालकांसाठी सुरु करण्यात आली आहे. 1800 11 8004 या क्रमांकावरुन विद्यार्थी आणि पालकांचं समुपदेशन केलं जाणार आहे. ही सुविधा 24 मे पासून सुरु झाली आहे. (CBSE started Tele Counselling launched for class 10th 12th students and their Parents after launching app)

समुपदेशन कोणत्या वेळी केलं जाणार?

टेली काऊन्सलिंगबाबत माहिती देताना सीबीएसईनं दोस्त फार लाईफ अ‌ॅपवर देशातील 83 तज्ञ मार्गदर्शन करत आहेत. मात्र, हेल्पलाईनवर सीबीएसईशी संलग्नित असलेल्या 24 शाळांचे मुख्याध्यापक, समुपदेशक मार्गदर्शन करतील. हे तज्ज्ञ सोमवारी ते शुक्रवार सकाळी 9.30 ते 5.30 वाजेपर्यंत उपलब्ध असतील.

समुपदेशन दरवर्षी करण्यात येते

बोर्ड परीक्षांपूर्वी विद्यार्थी आणि पालकांवरील मानसिक तणाव कमी करण्यासाठी दरवर्षी समुपदेशन केलं जातं. कोरोना विषाणूच्या काळात विद्यार्थी आणि पालकांसाठी सीबीएसईनं विशेष प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ राखण्यासाठी सीबीएसईनं दोस्त फॉर लाईफ अ‌ॅप नुकतेच लाँच केले आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी सीबीएसईकडून समुपदेशन कार्यक्रम राबवला जातं आहे.

दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीचा निर्णय लवकरच

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 14 एप्रिल रोजी घेण्यात आला होता. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना गूण देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना निकाल मान्य नसेल त्यांची परीक्षा कोरोना संक्रमण संपल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल, असं सीबीएसईनं जाहीर केलं होते. दरम्यान, बारावी परीक्षांचं आयोजन कशा प्रकारे याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या निर्णयानुसार 1 जून रोजी कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन परीक्षांचं आयोजन करण्याबाबत निर्णय जाही होणार आहे.

संबंधित बातम्या:

CBSE 12th Board Exam 2021: सीबीएसई बारावीच्या परीक्षा दोन टप्प्यात घेण्याची शक्यता, ‘या’ तारखेपासून परीक्षेला सुरुवात?

CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षा होणार की नाही? राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी काय भूमिका घेतली?

CBSE started Tele Counselling launched for class 10th 12th students and their Parents after launching app

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.