JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर होणार, कुठे पाहाल रिझल्ट?

| Updated on: Mar 08, 2021 | 8:57 AM

जेईई मेन परीक्षेचा निकाल आज जारी केला जाणार आहे. (JEE Main 2021 Result)

JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर होणार, कुठे पाहाल रिझल्ट?
JEE-Main exam
Follow us on

JEE Main 2021 Result Date नवी दिल्ली : अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणारी जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main 2021 Result) आज जारी केला जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. (JEE Main 2021 Result)

जेईई मेन फेज-1 (JEE Main 2021) ही परीक्षा 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला घेण्यात आली. देशातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी जेईईकडून JEE Main Final Answer Key जारी केली आहे. ही Answer Key या jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटवर ही Answer Key चेक आणि डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.

असा पाहा निकाल

JEE Main Feb Result 2021

JEE Main Final Answer Key 2021 Direct Link

JEE Main February Result कसे कराल चेक?

Step 1 : विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईट वर जा.
Step 2 : या वेबसाईटवर JEE Main Feb Result या ऑप्शनवर क्लिक करा.
Step 3 : त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा.
Step 4 : यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
Step 5 : निकाल तपासा
Step 6 : त्यानंतर प्रिंट काढा.

जेईई मेन परीक्षा ही 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड घेण्यात आली होती. देशभरातील विविध केंद्रांवर जेईई मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 95 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. ही परीक्षा प्रथमच आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा 13 भाषांमध्ये घेण्यात आली होती.

JEE Main 2021 Result

संबंधित बातम्या : 

JEE Main 2021: परीक्षेसाठी नोंदणीची उद्या अंतिम तारीख, लवकर करा अर्ज

JEE Main 2021 फेब्रुवारी सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, ‘या’ दिवशी निकाल जाहीर होणार