AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main 2021: परीक्षेसाठी नोंदणीची उद्या अंतिम तारीख, लवकर करा अर्ज

JEE Main 2021: परीक्षेसाठी नोंदणीची उद्या अंतिम तारीख, लवकर करा अर्ज (tomorrow is last date for registration for JEE Main 2021 exam)

JEE Main 2021: परीक्षेसाठी नोंदणीची उद्या अंतिम तारीख, लवकर करा अर्ज
जाणून घ्या जेईई मेनचा निकाल कधी येणार, अशा प्रकारे तपासू शकाल
| Updated on: Mar 05, 2021 | 2:46 PM
Share

नवी दिल्ली : जेईई मेन परीक्षेच्या मार्चच्या सत्रासाठी नोंदणीची उद्याशेवटची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांना मार्च सत्र परीक्षेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी (जेईई मेन नोंदणी 2021). Jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. जेईई मुख्य मार्च सत्र परीक्षा (जेईई मेन 2021 मार्च परीक्षा) 15 ते 18 मार्च दरम्यान घेण्यात येईल. ही परीक्षा देशातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. ही परीक्षा 15 ​​भाषांमध्ये घेतली जाईल. जेईई मेन 2021 हॉल तिकिट लवकरच जारी केले जाईल. विद्यार्थी जेईईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचे हाल तिकिट डाऊनलोड करू शकतील. हॉल तिकिट डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने लॉग ईन करावे लागेल. (tomorrow is last date for registration for JEE Main 2021 exam)

काळजीपूर्वक भरा अर्ज

यावेळी जेईई मेन अर्जात दुरुस्तीचा कोणताही पर्याय देण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. वेळेच्या अभावामुळे अर्ज दुरुस्तीचा पर्याय दिला नसल्याचे सांगितले जात आहे. जेईई मुख्य मार्च परीक्षेसाठी विद्यार्थी खालील प्रकारे नोंदणी करू शकतात.

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जा. स्टेप 2: यानंतर वेबसाईटवर दिलेल्या JEE (Main) March 2021 Session: Fill Registration Form या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: जर आपण प्रथमच अर्ज भरणार असाल तर New Registration लिंक वर क्लिक करा, किंवा लॉग ईन करा. स्टेप 4: लॉग इन केल्यानंतर, अर्ज, जसे की नाव, पत्ता, ईमेल, पालकांचे नाव आणि इतर माहितीमध्ये मागितलेली माहिती सबमिट करा. स्टेप 5: आता आपली स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करा. स्टेप 6: अॅप्लिकेशन शुल्क सबमिट करा. स्टेप 7: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अॅप्लिकेशनचे प्रिंट आऊट घ्या.

लवकरच फेब्रुवारीच्या परीक्षेचा निकाल

जेईई मेन फेब्रुवारी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. परीक्षेची उत्तर पत्रिका जाहीर करण्यात आली आह. या महिन्यात लवकरच निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. (tomorrow is last date for registration for JEE Main 2021 exam)

इतर बातम्या

आता चुकलात तर स्वस्तात घर, दुकान खरेदी करण्याची संधी हुकेल, आजपासून बंपर ऑफर

Taapsee Pannu | BMW, Mercedes सारख्या लक्झरी गाड्यांचा शौक, कोटींची संपत्ती! वाचा तापसीचा इन्कम फॉर्म्युला…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.