आता चुकलात तर स्वस्तात घर, दुकान खरेदी करण्याची संधी हुकेल, आजपासून बंपर ऑफर

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यासाठी खास बंपर ऑफर आणली आहे. एसबीआयचा देशभरात ई-ऑक्शन सुरु होणार आहे. (sbi auction purchase property)

आता चुकलात तर स्वस्तात घर, दुकान खरेदी करण्याची संधी हुकेल, आजपासून बंपर ऑफर
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 2:19 PM

मुंबई : अनेकांना घर, गाडी, जमीन घेण्याची मनापासून इच्छा असते. मात्र, जवळ पुरेसे भांडवल नसल्यामुले अनेकांच्या या इच्छा पूर्ण होत नाहीत. मात्र, आता चिंत्रा करण्याची गरज नाहीये. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यासाठी खास बंपर ऑफर आणली आहे. एसबीआयचा देशभरात ई-ऑक्शन सुरु होणार आहे. या ऑक्शन अंतर्गत तुम्हाल घर, दुकान, जमीन, गाडी, तसेच इतर मशिनरी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या ऑक्शनमध्ये जवळपास 1000 प्रॉपर्टीज विकण्यासाठी उपलब्ध असतील. (SBI mega auction start on 5 march great chance to purchase property)

ई-ऑक्शन काय आहे ?

एसबीआयकडून वेळोवेळी ई-ऑक्शनचे आयोजन केले जाते. ज्या व्यक्ती बँकेचे कर्ज निश्चित वेळेत भरु शकल्या नाहीत; त्यांना बँकेकडून डिफॉल्डर म्हणून घोषित केलं जातं. त्यानंतर कर्ज घेणाऱ्याकडून जी मालमत्ता तारण स्वरुपात ठेवली जाते, त्याच मालमत्तेचा लिलाव एसबीईयकडून केला जातो. त्यालाच ई-ऑक्शन म्हणतात. यावेळीदेखील एसबीआयने ई-ऑक्शनचे आयोजन केल्याचे ट्विट करुन सांगितले आहे. बँकेने सांगितले आहे की, ई-ऑक्शमध्ये देशभरातील प्रॉपर्टीज उबलब्ध असतील. देशातील एसबीआयच्या वेगवेगळ्या ब्रांचकडून संयुक्तपणेबोली लावण्यासाठी आमंत्रण दिले गेलेले आहे. त्यासाठी बँकेने रिझर्व प्राईससुद्धा ठरवलेली आहे. बँकेने वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रॉपर्टीसाठी वेगवेगळ्या तारीख निश्चित करुन दिलेल्या आहेत.

कमी किमतीत खरेदी करा

यावेली जवळपास 1000 मालमत्तांची बोली लागणार आहे. विशेष म्हणजे यावेळचा लिलाव कमी किमतीवर लागणार आहे. त्यामुळे विकण्यासाठी असलेल्या प्रॉपर्टीज या कमी किमतीवर खरेदी करता येतील. IBAPI च्या ऑफिशियल वेबसाईटवर याविषयी अधिकची माहिती दिलेली आहे. https://ibapi.in/ या वेबसाईट गेल्यानंतर मेल आयडी आणि मोबाईल नंबरच्या मदतीने तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यांनतर बोली लावण्यासाठी KYC डॉक्यूमेंट जमा करावे लागतील. त्यानंतर  आणखी काही प्रक्रिया तुम्हाला पार पाडाव्या लागतील.

लिलावात अशा प्रकारे सहभागी व्हा

> लिलावात सहभागी होण्यासाठी ऑनलाई पद्धतीने अर्ज करता येईल.

>> तुमच्या बँकेच्या ब्रांचवर जाऊन केवायसीसाठी पूर्ण कागदपत्रे जमा करावे लागतील. >> ई-लिलावामध्ये भाग घेण्यासाठी आधी अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणजेच EMD जमा करावे लागेल.

>> तुमच्या बँकेत EMD आणि KYC ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ई-लिलावात भाग घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेलवर किंवा मोबाईलवर एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. त्याच्या मदतीने तुम्हाला ई-लिलावात भाग घेता येईल.

लिलावासंदर्भात अधिकची माहिती या वेबसाईट्सवर मिळेल

C1 INDIA Pvt. Ltd: https://www.bankeauctions.com/Sbi

> e-Procurement Technologies Limited: https://sbi.auctiontiger.net/EPROC/

> For displaying of the properties : https://ibapi.in

> For auction platform: https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

इतर बातम्या :

Post Office मध्ये धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं

(SBI mega auction start on 5 march great chance to purchase property)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.