AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fitness Tips: 52 व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने सांगितलं फिटनेसचं रहस्य

Karishma Kapoor Fitness Secret: वयाच्या 52 व्या वर्षीही अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या फिटनेसचं रहस्य काय आहे, याबाबत सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. जाणून घेऊया

Fitness Tips: 52 व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने सांगितलं फिटनेसचं रहस्य
Karisma KapoorImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 23, 2026 | 11:26 AM
Share

वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे किंवा शरीरात बदल होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, वयाच्या ५२ व्या वर्षीही अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या फिटनेस आणि तरुण दिसण्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या ९ व्या सीझनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये खास पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. या शोमधील तिचा लूक पाहिल्यानंतर तिच्या फिटनेसची चर्चा सुरू झाली. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी करिश्माच्या फिटनेसचं रहस्य सांगताना, वाढत्या वयातही फिट आणि निरोगी राहण्यासाठी महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या.

करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य काय?

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. करिश्माच्या फिटनेसचं रहस्य केवळ दही-भात खाण्यात नाही, तर अनेक वर्षांपासून अंगीकारलेल्या चांगल्या सवयींमध्ये आहे.तिच्या फिटनेसचं श्रेय कोणत्याही एका गोष्टीला देता येणार नाही.

तिशीनंतर शरीरात होतात हार्मोनल बदल

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात हळूहळू हार्मोनल बदल होऊ लागतात. वयाच्या २० मध्ये फिट राहणं अनेकांना तुलनेने सोपं वाटतं. मात्र, तिशीनंतर काही महिलांचं वजन वाढू शकतं, कंबरेच्या आसपास चरबी जमा होऊ शकते किंवा शरीराच्या ठेवणीत बदल जाणवू शकतात. त्यामुळे या वयापासूनच आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

वजन कमी करण्याऐवजी आठवड्यात करा हे काम

ऋजुता दिवेकर यांनी महिलांना केवळ वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याऐवजी शरीर मजबूत आणि सक्रिय ठेवण्यावर भर द्यावा. यासाठी आठवड्यातून किमान तीन तास व्यायाम करण्याबद्दल त्यांनी सांगितले. वेगाने चालणं, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि आपल्या क्षमतेनुसार इतर शारीरिक हालचाली दिनचर्येत समाविष्ट करता येतात. नियमित व्यायामामुळे हाडांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.

तिशीत या गोष्टी खाणं बंद करू नका

फिट राहण्यासाठी अनेक महिला आहारातून भात, पोळी, कार्बोहायड्रेट्स किंवा साखर पूर्णपणे वगळतात. काही जणी वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवणही टाळतात. मात्र, गरज नसताना आहारावर इतकी बंधनं घालणं टाळावं, असं ऋजुता दिवेकर सांगतात. त्यांच्या मते, भात, कार्बोहायड्रेट्स किंवा साखर पूर्णपणे बंद करण्याऐवजी संतुलित आहार घ्यावा आणि खाण्याचा आनंदही जपावा. आहारावर अतिप्रमाणात निर्बंध घातल्यास व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२, लोह आणि कॅल्शियम यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते.

Follow Us
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी