Home Loan : कोटक महिंद्रा बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज? जाणून घ्या व्याजदर

सध्या कोटक महिंद्रा बँकेचा गृहकर्जावरील व्याजदर सर्वात कमी आहेत. सध्याचा व्याजदर पाहिला तर तो 6.75 टक्के आहे.

Home Loan : कोटक महिंद्रा बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज? जाणून घ्या व्याजदर
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 7:55 PM

मुंबई : तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. महागाईच्या काळात स्वत:चं घर घेणं तितकं सोपं राहिलेलं नाही. अशावेळी तुम्हाला तुमचं हक्काचं घर घेण्यासाठी गृहकर्ज हा मोठा आधार असतो. अनेक लोक घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतात. अनेक सरकारी आणि खासगी बँका ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करुन देतात.(Kotak Mahindra Bank is providing the cheapest home loan)

लोकांच्या व्यवहारात वाढ होण्यासाठी RBI ने केलेल्या उपाययोजना आता उपयुक्त ठरताना दिसत आहेत. रेपो रेटमध्ये सातत्यानं बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे गृहकर्जाचे व्याजदर सात टक्क्यांपेक्षा खाली आले आहेत. त्यात बँकांमधील स्पर्धांमुळे गृहकर्जाचे व्याजदर आता सर्वात कमी स्तरावर पोहोचले आहेत. त्यातही पहिल्यांदाच एखाद्या खासगी बँकेनं सरकारी बँकेपेक्षा गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

कोटक महिंद्रा बँक देतेय सर्वात स्वस्त गृहकर्ज

सध्या कोटक महिंद्रा बँकेचा गृहकर्जावरील व्याजदर सर्वात कमी आहेत. सध्याचा व्याजदर पाहिला तर तो 6.75 टक्के आहे. तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या 6.8 टक्के व्याजदरानं गृहकर्ज उपलब्ध करुन देत आहे. आता कोटक महिंद्रा बँकेचा डीजिटल प्लॅटफॉर्म कोटक डिजी होम लोन फिचरच्या माध्यमातून तुम्ही आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करु शकणार आहात. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही व्यक्ती ऑनलाईन माधम्यातून त्याला कितीपर्यंत गृहकर्ज मिळू शकतं हे पाहू शकतो. तसंच किती दराने व्याज चुकवावं लागेल हे ही तो पाहू शकणार आहे. त्याचबरोबर तो व्यक्ती ऑनलाईनच इन-प्रिन्सिपल सँक्शन लेटर मिळवू शकतो.

कोटक डिजी गृह कर्जाबाबत खास माहिती

1. कोटक महिंद्रा बँक पूर्णपणे डीजिटल आणि पेपरलेस प्रक्रियेच्या माध्यमातून गृहकर्ज उपलब्ध करुन देत आहे. ही सेवा जुन्या आणि नव्या ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही सेवा पगारदार आणि सेल्फ-एम्प्लॉईड ग्राहकांसाठी दिली जात आहे.

2. ग्राहक डिजी होम लोनच्या माध्यमातून गृहकर्जासाठी अर्ज करु शकतात. त्याचबरोबर बॅलन्स ट्रान्सफर आणि टॉप-अप लोनसाठी अर्ज करु शकतात. कोटक डिजी होम लोनसाठी कोटक बँकेच्या वेबसाईटवर जाऊन घरी बसून तुम्ही अर्ज करु शकता.

3. कोटक डिजी होम लोन ऑनलाईनच क्रेडिट मूल्यांकन करतं. त्यामुळे अर्जदाराला त्याच्या क्रेडिटनुसार किती गृहकर्ज मिळू शकतं याची माहिती मिळते. त्यासह व्याजदर, कर्जाचा अवधी आणि EMIबाबतही माहिती दिली जाते.

4. अर्जदार आपल्या गरजेनुसार कर्जाची रक्कम आणि कर्ज फेडण्याचा अवधी निवडू शकतो. त्यासह कर्जाची रक्कम वाढवण्यासाठी अजून एक अर्जदारही जोडता येऊ शकतो. त्यानंतर अर्जदाराला इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर मिळतं आणि कागदपत्र जमा करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होते.

5. कोटक होम लोन आणि बॅलन्स ट्रान्सफरचा दर 6.75 टक्के आहे. हा व्याजदर गृह कर्जाच्या मार्केटमध्ये सर्वात कमी दर आहे.

संबंधित बातम्या :

42 कोटी ग्राहकांनी SBIची भेट! आता घरबसल्या मिळवा बँकेच्या या 9 सेवा

महिन्याला फक्त 1000 रुपये गुंतवा आणि मिळवा बक्कळ पैसा, खास आहे पोस्टाची योजना

Kotak Mahindra Bank is providing the cheapest home loan

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.