महिन्याला फक्त 1000 रुपये गुंतवा आणि मिळवा बक्कळ पैसा, खास आहे पोस्टाची योजना

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:30 PM, 19 Jan 2021
1/10
you can make big retirement fund by investing in NPS know how it works
पगाराचे नियोजन करणे आवश्यक!
2/10
India Post IPPB customers can now transact through app DakPay
पोस्ट ऑफिस बचत योजना
3/10
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित असणार आहेत.
4/10
पोस्ट ऑफिसच्या मासिक बचत योजनेमध्ये (MIS) तुम्ही एकाच खात्यामधून 1000 ते साडेचार लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर तुमचं जॉईंट खातं असेल तर जास्तीत जास्त पैशांची मर्यादा 9 लाख रुपयांपर्यंत आहे.
5/10
म्हणजेच पती-पत्नी दोघेही एकत्र खात्यामध्ये 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
6/10
या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अल्पवयीन मुलांच्या नावानेही गुंतवणूक करता येते. यासाठी खात्यात 3 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.
7/10
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये (POMIS) सध्या वार्षिक व्याज 6.5 टक्के आहे.
8/10
या योजनेत नाव नोंदण्यासाठी पीओएमआयएसचा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरत असताना तुम्हाला ओळखपत्र, निवासी पुरावा, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असणार आहेत.
9/10
पोस्ट ऑफिसच्या या योजनेची मुदत 5 वर्षे आहे. यामध्ये जर तुम्ही वेळेआधी पैसे काढले तर तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. यामध्ये एका वर्षात पैसे काढण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
10/10
काय आहेत या खात्याचे फायदे? - सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एका पोस्ट ऑफिसमधून तुम्ही दुसर्‍या पोस्टवर योजना शिफ्ट करू शकता. 5 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला पुन्हा रक्कम गुंतवण्याची संधी मिळते. या खास योजनेमध्ये टीडीएस कपात केली जात नाही, पण व्याजावर कर भरावा लागतो.