Chandrakant Patil : गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचा पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत मोठा दावा, म्हणाले, 50 टक्क्यांपेक्षा…
गोकुळनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी गोकुळसारखाच आकडेवारी सांगत मोठा दावा केला आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतदान होत आहे. राज्याचं लक्ष पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाकडे लागलं आहे. या मतदारसंघासाठी कोल्हापुरातील मतदान केंद्राबाहेर बुथला चंद्रकांत पाटील भेटी दिल्या. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मतदानकेंद्राजवळ असलेल्या मतदारांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा दावा केला. शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार दिला तरी त्याचा उपयोग नाही. पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील दोन्ही उमेदवार एकतर्फी म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा मतं घेऊन विजयी होतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांना केला. यावेळी त्यांनी त्यांच्या विजयाबाबत कोणतीही शंका नसल्याचेही म्हटलं.
चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीसहित विविध घडामोडींवर देखील भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवर बोलताना त्यांनी ऑडिओ क्लिपवर शंका उपस्थित केली. त्यांनी ओडिओ क्लिप एआय निर्मित असे शकते, असा दावा केला. यावर महायुतीमधील नेत्यांनी खात्रीशिवाय प्रतिक्रिया देऊ नये, असा सल्ला दिला. तर धंगेकरांच्या भूमिकेबाबत विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘महायुतीत काम करताना माझ्यासहित सर्वांनी सांभाळून बोलायलं हवं’.
पुणे पदवीधर मतदारसंघात 741 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. तर शिक्षक मतदारसंघात 310 मतदान केंद्रावर मतदान होतंय. पदवीधर मतदारसंघातील संघाच्या निवडणुकीत 47 उमेदवार रिंगणात आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यात 1 हजार 51 मतदान केंद्रे आहेत. या दोन्ही मतदारसंघात 4 लाख 49 हजार 959 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे सचिन सानप, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपकडून कौस्तुभ गावडे मैदानात आहेत. तर पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून स्मिता जाधव तर शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात मुख्य लढत असणार आहे. पुणे विभागात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा सामावेश आहे. या पाचही जिल्ह्यातील मतदानाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
