AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MHT CET 2023 Counselling: अभ्यासक्रमासह तारखांची यादी! महाराष्ट्र सीईटी 2023 काउंसलिंग शेड्यूल जारी, उद्यापासून करा रजिस्ट्रेशन

उमेदवार cetcell.mahacet.org अधिकृत वेबसाइटवर जारी केलेला समुपदेशन कार्यक्रम पाहू शकतात. कोणत्या अभ्यासक्रमाच्या समुपदेशन नोंदणीसाठी कोणता दिवस देण्यात आलाय ते या वेळापत्रकात देण्यात आलेलं आहे.

MHT CET 2023 Counselling: अभ्यासक्रमासह तारखांची यादी! महाराष्ट्र सीईटी 2023 काउंसलिंग शेड्यूल जारी, उद्यापासून करा रजिस्ट्रेशन
MHT CET CounsellingImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 14, 2023 | 12:19 PM
Share

मुंबई:  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र ने MHT CET 2023 समुपदेशन वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवार cetcell.mahacet.org अधिकृत वेबसाइटवर जारी केलेला समुपदेशन कार्यक्रम पाहू शकतात. कोणत्या अभ्यासक्रमाच्या समुपदेशन नोंदणीसाठी कोणता दिवस देण्यात आलाय ते या वेळापत्रकात देण्यात आलेलं आहे.

यंदा एमएचटी सीईटीसाठी 6.36 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स) गटाची सीईटी परीक्षा 9 ते 13 मे 2023 या कालावधीत घेण्यात आली होती, त्यासाठी 3,03,048 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी 2,77,403 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

Counselling date maharashtra CET

Counselling date maharashtra CET

PCB (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) गटासाठी सीईटी परीक्षा 2023 ते 15 मे 20 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 3,33,041 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 3,13,732 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विद्यार्थ्यांनी नोंदणीपूर्वी जारी केलेली अधिसूचना वाचावी आणि नियमानुसार नोंदणी करावी. अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि व्यवस्थित भरावी लागते.

Counselling MH- CET

Counselling MH- CET

नोंदणीच्या या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा

  • बीई, बीटेक – 15 जून
  • एमबीए/एमएमएमएस – 15 जून
  • एमसीए – 15 जून
  • एलएलबी 5 वर्ष – 15 जून
  • बीए बीएड, B.Sc बीएड 4 साल – 15 जून
  • बीएड- 15 जून
  • कृषी – 15 जून
  • बी फार्मसी – 15 जून
  • एम फार्मसी – 15 जून
  • बीएचएमसीटी – 16 जून
  • प्लान बी: 16 जून
  • बीएड आणि ईएलसीटी – १६ जून
  • एमएड – 16 जून
  • बी डिजाइन- 16 जून
  • एमई, एमटेक – 16 जून
  • एलएलबी तिसरे वर्ष – 18 जून
  • एमपी एड – 18 जून
  • बीपीडी – 18 जून
  • एम. आर्क- 18 जून
  • एम. एचएमसीटी – 18 जून

महाराष्ट्र सीईटी 2023 चा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला होता. ही नोंदणी प्रक्रिया 8 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत चालली. समुपदेशन प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Follow Us
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा