AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET PG 2021 Admit Card released:नीट पीजी परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर, डाऊनलोड करण्यसाठी nbe.edu.in ला भेट द्या

NEET PG 2021 परीक्षेचे ॲडमिट कार्ड nbe edu in या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येईल. NEET PG Admit Card Released

NEET PG 2021 Admit Card released:नीट पीजी परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर, डाऊनलोड करण्यसाठी nbe.edu.in ला भेट द्या
नीट परीक्षा
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Apr 14, 2021 | 10:24 AM
Share

NEET PG Admit Card released नवी दिल्ली: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून (NBE) नॅशनल एलिजीबीलिटी एंट्रास टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट (NEET PG 2021) परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जारी करण्यात आलं आहे. नीट पीजी 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड ऑफिशियल वेबसाईट nbe.edu.in वरुन डाऊनलोड करता येईल. विद्यार्थ्यांना अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करायचे असल्यास नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. NEET PG 2021 परीक्षा 18 एप्रिल 2021ला आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दुपारी 1 ते सांयकाळी 5:30 वाजेदरम्यान आयोजित केली जाईल . ही परीक्षा कॉम्प्यटर बेस्ड पद्धतीनं होणार आहे.(NEET PG Admit Card 2021 released download from nbe edu in check how to download)

ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी आयोजित केली जाणार आहे. NEET PG 2021 परीक्षा केंद्रांविषयी माहिती अ‌ॅडमिट कार्डवर दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन परीक्षा केंद्रांवर कसे पोहोचायचे या विषयी माहिती मिळवावी.

NEET PG 2021 Admit Card डाऊनलोड कसे करायचे?

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी एनबीईची ऑफिशियल वेबसाईट nbe.ed.u.in वर भेट द्यावी. स्टेप 2: वेबसाईट वर दिलेल्या “NEET PG 2021 Admit Card” लिंक वर क्लिक करा. स्टेप 3: युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. स्टेप 4: तुम्हाला तुमचे अ‌ॅडमिट कार्ड उपलब्ध होईल. स्टेप 5: अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून ठेवा.

निकाल कधी जाहीर होणार

NEET PG 2021 परीक्षेचा निकाल 31 मेपर्यंत जाहीर केला जाणार आहे. हा निकाल nbe.edu.in या वेबासाईटवर जाहीर केला जाईल. NEET PG 2021 परीक्षा मेडिकलमध्ये मास्टर्स करण्याची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत MBBS आणि BDS चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मात्र,त्या विद्यार्थ्यांनी इटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. MBBS हा पदवी आणि MD पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

NEET UG परीक्षा 1 ऑगस्टला

राष्ट्रीय पात्रता किंवा प्रवेश चाचणी किंवा एनईईटी(NEET) 2021 परीक्षा 1 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर एमबीबीएस प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षेसाठी अर्ज लवकरच सुरू होईल. एमबीबीएस / बीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी प्रवेश पोर्टल ntaneet.nic.in वर नोंदणी करावी लागेल.

संबंधित बातम्या:

NEET PG 2021 Admit Card: नीट पीजी परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर होणार, डाऊनलोड करण्याच्या सोप्या टिप्स

Board Exam 2021: बोर्ड परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांच्या मागणीला सोनू सूदचा पाठिंबा, सरकारला सांगितला ‘हा’ उपाय

(NEET PG Admit Card 2021 released download from nbe edu in check how to download)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ