UPSC यशोगाथा: एका अपमानाने बदलले आयुष्य, प्रियांका शुक्ला यांचा डॉक्टर ते IAS अधिकारी पर्यंतचा रंजक प्रवास

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ज्या उमेदवारांनी ती पार केली त्यांची कहाणी लाखो तरुणांना नेहमीच प्रेरणा देते. IAS अधिकारी प्रियांका शुक्लाची कथाही अशीच प्रेरणादायक आहे, तिची कथा इतरांपेक्षा वेगळी आणि खुप रंजक आहे.

UPSC यशोगाथा: एका अपमानाने बदलले आयुष्य, प्रियांका शुक्ला  यांचा डॉक्टर ते  IAS अधिकारी पर्यंतचा रंजक प्रवास
प्रियांका शुक्ला यांचा डॉक्टर ते IAS अधिकारी पर्यंतचा रंजक प्रवास
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 4:31 PM

2009 मध्ये UPSC परीक्षेत यश मिळवून IAS झालेली प्रियांका शुक्ला पेशाने डॉक्टर होती. डॉक्टर ते आयएएस अधिकारी बनण्याची त्यांची कहाणी खूप च रंजक आहे. UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असून, ज्या उमेदवारांनी ही परीक्षा पास केली त्यांचा इतर उमेदवारांना नेहमीच आदर्श वाटत असतो. IAS अधिकारी प्रियांका शुक्लाची कथा इतरांपेक्षा वेगळी आणि प्रेरणादायी (Inspirational) ठरणारी आहे. प्रियांका शुक्लाने किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज (KGMU) मध्ये शिक्षण घेतले आणि तिथून एमबीबीएस पूर्ण केले. त्यांनी आयएएस अधिकारी (IAS officer) व्हावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची नेहमीच इच्छा होती. त्याचे वडील हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील विभागात कार्यरत होते. प्रियंका सांगते की, तिच्या वडिलांनी सांगितले की त्यांना प्रियांकाच्या नावाची पाटी त्यांच्या घरासमोर कलेक्टर (Collector) म्हणून छापलेली पहायची आहे. अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर तीने अभ्यासाला सुरूवात केली.

प्रियांकाने एमबीबीएस प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी लखनौमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. डॉक्टर झाल्याचा तिला खूप आनंद झाला. पण एका घटनेने किंवा एखाद्या अपमानाने त्याचे आयुष्य बदलून टाकले असे म्हणता येईल. एकदा प्रियांका झोपडपट्टी भागात चेकअप करण्यासाठी गेली होती. तिथे एक महिला घाणेरडे पाणी पीत होती आणि मुलांनाही पाजत होती. प्रियांकाने त्या महिलेला गलिच्छ पाणी पिण्यास मनाई केली. त्यावर ती महिला म्हणाली की तुम्ही कुठल्या कलेक्टर आहात का? हे ऐकून प्रियंका हादरली आणि तिने आयएएस होण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच प्रयत्नात प्रियंका यूपीएससीमध्ये नापास झाली, पण तिने हार मानली नाही आणि कलेक्टर व्हायचे ठरवले. अखेर 2009 मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. आयएएस अधिकारी झाल्यानंतर प्रियंका शुक्ला यांनी लोकांचे जीवन बदलण्याचे ध्येय बनवले आहे.

वडीलांचे स्वप्न केले खरे

प्रियंका यांनी आयएएस अधिकारी व्हावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची नेहमीच इच्छा होती. त्याचे वडील हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील विभागात कार्यरत असतांना, तिच्या वडिलांनी प्रियांकाच्या नावाची पाटी त्यांच्या घरासमोर कलेक्टर म्हणून छापलेली पाहाण्याचे स्वप्न पाहीले होते. प्रियंका यांनी, एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी लखनौमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. डॉक्टर झाल्याचा तिला खूप आनंद झाला होता. त्यानंतर त्यांनी त्या महिलेचे बोलने मनावर घेऊन रात्र दिवस अभ्यास करण्यास सुरूवात केली. पहिल्या प्रयत्नात अपय़श आल्यावरही त्यांनी हार न मानता, कसोशीने प्रयत्न सुरू ठेवले आणि परीक्षेत यश मिळवून आपल्या वडीलांचे स्वप्न खरे केले.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.