100 कोटी लोकांनी पाहिलेलं गाणं, ज्याला सरगुन मेहता यांनी दिलेला नकार, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ
100 कोटी लोकांनी पाहिलेलं गाणं, ज्याला सरगुन मेहता यांनी पहिल्यांदा दिलेला नकार. मात्र, प्रदर्शित होताच या गाण्याला मिळालेली तुफान लोकप्रियता. आजही प्रचंड क्रेझ.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही गाणी अशी आहेत, जी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यातीलच एक गाणं म्हणजे पंजाबी गायक अफसाना खान आणि हार्डी संधू यांचं ‘तितलियां’. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याला यूट्यूबवर तब्बल 100 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये अभिनेत्री सरगुन मेहता आणि हार्डी संधू झळकले होते.
‘तितलियां’ या गाण्यासाठी सरगुन मेहता यांना जानी यांनी संपर्क केला होता. मात्र, सुरुवातीला सरगुन यांचा हा म्युझिक व्हिडीओ करण्याचा मूड नव्हता. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, त्यांनी सुरुवातीला गाणं करण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर त्यांनी होकार दिला आणि त्या या गाण्याचा भाग बनल्या.
गाण्याच्या स्क्रिप्टमध्ये करण्यात आला होता बदल
सरगुन यांनी सांगितलं की, त्या तयार झाल्यानंतर गाण्याची स्क्रिप्ट बदलण्यात आली. अखेर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि ‘तितलियां’ हे गाणं सरगुन मेहता यांच्या लोकप्रिय कामांपैकी एक ठरलं.
‘तितलियां’ या गाण्यात एका विवाहित पुरुषाची आणि त्याच्या पत्नीची कथा दाखवण्यात आली आहे. हार्डी संधू पत्नीची फसवणूक करून इतर मुलींच्या मागे फिरत असतो. सरगुन मेहता त्याला वारंवार संधी देतात. मात्र, त्याच्या वागण्यात बदल होत नाही.
चित्रपटाची कथा
अखेर पतीच्या वागण्याला कंटाळलेल्या पत्नीच्या मनात बदला घेण्याची भावना निर्माण होते. गाण्याच्या शेवटी ती हार्डी संधूच्या व्यक्तिरेखेला मारण्याचा कट रचते. त्यामुळे या गाण्यात प्रेम, विश्वासघात आणि बदल्याची कथा पाहायला मिळते.
यूट्यूबवर 100 कोटींहून अधिक व्ह्यूज
‘तितलियां’ हे गाणं जानी यांनी लिहिलं आणि संगीतबद्ध केलं होतं. अफसाना खान यांनी गाणं गायलं असून, हार्डी संधू यांचाही या प्रोजेक्टमध्ये सहभाग होता. या गाण्याला यूट्यूबवर 1 बिलियन म्हणजेच 100 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आजही हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर या गाण्याचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे.