बॉलिवूडचं सर्वात वादग्रस्त गाणं, तरीही ठरलं सुपरहिट, नव्या व्हर्जनने कमावले 25 कोटी

बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त गाण्याचे नवीन व्हर्जनने केली प्रचंड कमाई. चित्रपटाच्या निर्मात्यांना झाला प्रचंड फायदा. फक्त गाण्यानेच केली इतकी कमाई.

बॉलिवूडचं सर्वात वादग्रस्त गाणं, तरीही ठरलं सुपरहिट, नव्या व्हर्जनने कमावले 25 कोटी
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 12, 2026 | 3:06 PM

बॉलिवूडमध्ये जुन्या गाण्यांना नव्या अंदाजात सादर करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जुनी गाणी नव्या व्हर्जनमुळे पुन्हा लोकप्रिय होत असून, त्याचा फायदा निर्मात्यांनाही होत आहे. असंच एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘चोली के पीछे’. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘खलनायक’ चित्रपटातील या गाण्याची जादू आजही कायम आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रू’ चित्रपटात या गाण्याचा नवा अवतार पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, या गाण्यामुळे निर्मात्या शोभा कपूर यांना तब्बल 25 कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा झाल्याचा खुलासा निर्माता आणि व्यावसायिक कुमार तौरानी यांनी केला आहे.

कुमार तौरानी यांनी अलीकडेच त्यांचे भाऊ रमेश तौरानी यांच्यासोबत प्रसिद्ध चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांच्या ‘गेम चेंजर्स ऑफ इंडिया’ या यूट्यूब कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी जुन्या गाण्यांच्या नव्या आवृत्त्यांबद्दल आणि संगीत क्षेत्रातील बदलांबद्दल भाष्य केलं.

Loading...

2024 मध्ये आलेल्या ‘क्रू’ चित्रपटातील ‘नैना’ आणि ‘चोली के पीछे’ ही गाणी लोकप्रिय ठरली होती. याच संदर्भात बोलताना कुमार तौरानी यांनी सांगितलं की, ‘चोली के पीछे’ या गाण्याच्या नव्या व्हर्जनमुळे शोभा कपूर यांना 25 कोटी रुपये अतिरिक्त मिळाल्याचं त्यांनी स्वतः त्यांना सांगताना ऐकलं होतं.

जुन्या गाण्यांच्या नव्या व्हर्जनचा वाढतोय ट्रेंड

कुमार तौरानी यांच्या मते, जुन्या लोकप्रिय गाण्यांना नव्या स्वरूपात सादर केल्यामुळे त्यांची लोकप्रियता पुन्हा वाढते. ‘चुनरी चुनरी’, ‘चम्मा चम्मा’ आणि ‘आंखों से तूने 2.0’ यांसारख्या गाण्यांच्या नव्या आवृत्त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. नव्या व्हर्जनमुळे गाण्यांचे स्ट्रीमिंग वाढते आणि त्याचा फायदा मूळ गाण्यांनाही होतो असं त्यांनी नमूद केलं.

‘क्रू’ हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करीना कपूर खान, तब्बू आणि कृती सेनॉन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील ‘चोली के पीछे’ या गाण्याच्या नव्या आवृत्तीला ईला अरुण, अलका याज्ञिक, दिलजीत दोसांझ आणि आयपी सिंह यांनी आवाज दिला होता. गाण्यातील ‘कू कू कू कू’ हा खास भागही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us