36 वर्षे जुनी मालिका, पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंब काम आवरून टीव्हीसमोर बसायचं, आजही लोक युट्यूबवर फ्रीमध्ये बघतात

36 वर्षे जुना 48 भागाचा प्रसिद्ध टीव्ही शो, ज्याने TRP मध्ये मोडले होते अनेक रेकॉर्ड, आजही लोक युट्यूबवर सर्च करून बघतात.

| Updated on: Apr 15, 2026 | 12:18 PM
1 / 6
80-90 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. त्या काळात प्रत्येकाच्या घरी टीव्ही नव्हता पण ज्या घरात टीव्ही असे तिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून कार्यक्रम पाहण्याची खास परंपरा होती.

80-90 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. त्या काळात प्रत्येकाच्या घरी टीव्ही नव्हता पण ज्या घरात टीव्ही असे तिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून कार्यक्रम पाहण्याची खास परंपरा होती.

2 / 6

टीव्ही हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून कुटुंबाला एकत्र आणणारा दुवा होता. रविवारच्या सकाळपासून ते रात्रीच्या प्राइम टाइमपर्यंत घरातील सर्व कामे आधी पूर्ण केली जात होती. जेणेकरून एकही कार्यक्रम चुकू नये.

3 / 6

अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे चाणक्य ही ऐतिहासिक मालिका. जवळपास 36 वर्षांपूर्वी, म्हणजे 1990 साली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही या मालिकेला IMDb वर तब्बल 9.3 इतकी उच्च रेटिंग मिळाली आहे.

4 / 6

ही मालिका डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी लिहिली, दिग्दर्शित केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही साकारली. विशेष म्हणजे, त्या काळात अनेकांना हे माहीतही नव्हते की मुख्य भूमिका करणारे कलाकारच या मालिकेचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत.

5 / 6

या ऐतिहासिक मालिकेचे एकूण 48 भाग होते आणि प्रत्येक भाग सुमारे 45 ते 50 मिनिटांचा होता. त्या काळात या मालिकेने TRP मध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला.

6 / 6

आजच्या डिजिटल युगातही ‘चाणक्य’ मालिकेची लोकप्रियता कायम आहे. ही मालिका यूट्यूबवर उपलब्ध असून, जुनी पिढीच नाही तर नवीन पिढीही ती आवडीने पाहत आहे. केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, इतिहास, राजकारण आणि रणनीती समजून घेण्यासाठीही ही मालिका उपयुक्त ठरते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us