भाचा-भाची यांना मामाच्या प्रेमाची आठवण करून देणारं 47 वर्ष जुनं गाणं, आजही प्रचंड लोकप्रिय

प्रत्येक भाचा-भाची हे गाणं मामासाठी नेहमी गातात. 47 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट. मोहम्मद रफी-उषा मंगेशकर यांच्या आवाजामुळे आणि वर्मा मालिक यांच्या गीतामुळे आजही प्रचंड लोकप्रिय.

भाचा-भाची यांना मामाच्या प्रेमाची आठवण करून देणारं 47 वर्ष जुनं गाणं, आजही प्रचंड लोकप्रिय
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 28, 2026 | 7:36 PM

भाचा-भाची आणि मामा यांचं नातं हे प्रत्येक कुटुंबासाठी खास असतं. ‘मामा’ या शब्दातच दोनदा ‘आई’ येते, असं म्हटलं जातं. त्यामुळे मामा आणि भाचा-भाची यांच्यातील नात्याला विशेष महत्त्व आहे. याच सुंदर नात्याचं प्रेमळ चित्रण करणारे ‘चंदा मामा से प्यारे मेरे मामा’ हे गाणं आजही अनेकांच्या आवडीचं आहे.

हे गाणं 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कर्तव्य’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या गाण्याला मोहम्मद रफी आणि उषा मंगेशकर यांनी आवाज दिला आहे. तर संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, गाण्याचे बोल वर्मा मलिक आणि काफिल अजमेर यांनी लिहिले आहेत.

Loading...

मामाच्या प्रेमाची भावूक कहाणी

‘चंदा मामा से प्यारे मेरे मामा’ या गाण्यात भाचा-भाची आणि मामामधील प्रेम अतिशय भावूक पद्धतीने मांडण्यात आलं आहे. आपल्या भाचीच्या लग्नाची स्वप्नं पाहणारा मामा आणि लग्नानंतर भाची दूर जाण्याची कल्पना यामुळे गाण्यात भावनिक वातावरण निर्माण होतं.

‘चंदा मामा से प्यारा मेरा मामा, मेरी आंखों का तारा मेरा मामा’ या ओळींमधून मामाबद्दलचं निरागस प्रेम व्यक्त होतं. काळ बदलला, संगीताच्या अनेक नवीन शैली आल्या, तरी या गाण्यातील भावनिक नातं आजही प्रेक्षकांच्या मनाला भिडतं.

‘कर्तव्य’ची कथा काय?

1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कर्तव्य’ चित्रपटाची कथा विजय नावाच्या वन अधिकाऱ्याभोवती फिरते. विजयची जंगलात बदली होते. विशेष म्हणजे याच जंगलात त्याच्या वडिलांची हत्या झालेली असते. जंगलामध्ये चंदन, हत्तीच्या दातांची आणि प्राण्यांच्या कातडीची तस्करी सुरू असते. विजय आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत या तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतो.

चित्रपटातील इतर गाण्यांनाही लोकप्रियता मिळाली होती. मात्र ‘चंदा मामा से प्यारे मेरे मामा’ हे गाणं मामाच्या प्रेमाचं सुंदर चित्रण करत असल्यामुळे आजही श्रोत्यांच्या आठवणीत आहे. आजही हे गाणं अनेकजण ऐकताना सोशल मीडियावर प्रेक्षक दिसतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us