58 वर्षांपूर्वीचं आईचं कौतुक करणारं गाणं, ऐकताच डोळ्यात येते पाणी, आजही वेळ काढून ऐकतात लोक

58 वर्षांपूर्वीच्या या गाण्यात आईचं करण्यात आलं आहे प्रचंड कौतुक. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट. आजही ऐकताना डोळ्यात येते पाणी.

58 वर्षांपूर्वीचं आईचं कौतुक करणारं गाणं, ऐकताच डोळ्यात येते पाणी, आजही वेळ काढून ऐकतात लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 01, 2026 | 1:29 PM

हिंदी चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिकेला नेहमीच विशेष महत्त्व मिळालं आहे. विशेषतः 80 आणि 90 च्या दशकातील चित्रपटांमध्ये आईच्या व्यक्तिरेखेला कथेला भावनिक वळण देण्यासाठी मोठ्या प्रभावीपणे वापरलं जायचं. ‘त्रिशूल’पासून ‘अमर अकबर अँथनी’पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आईचं स्थान कथेत मध्यवर्ती राहिलं. आईच्या प्रेमावर आधारित अनेक गाणीही प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून गेली. त्यापैकीच एक म्हणजे 1968 साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा और रंक’ चित्रपटातील ‘तू कितनी अच्छी है’ हे अजरामर गाणं.

‘तू कितनी अच्छी है’ हे गाणं आई आणि मुलाच्या नात्यातील निरागस प्रेमाची जाणीव करून देतं. लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजाने सजलेल्या या गाण्याचे गीतकार आनंद बक्षी, तर संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल होते. पडद्यावर निरूपा रॉय आणि महेश कोठारे यांच्या भावनिक नात्यामुळे या गाण्याला आणखी प्रभावी रूप मिळालं.

Loading...

गाण्यात एक मुलगा आपल्या आईचं प्रेम, तिचा त्याग आणि मुलासाठी जागून काढलेल्या रात्रींची जाणीव व्यक्त करतो. त्यामुळे हे गाणं ऐकताना प्रत्येकाला आपल्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. गाण्याचे शब्द, संगीत आणि त्याचं भावपूर्ण चित्रिकरण आजही प्रेक्षकांच्या मनाला भिडतं.

निरूपा रॉय यांची ‘आई’ म्हणून खास ओळख

निरूपा रॉय यांचं नाव घेतलं की हिंदी सिनेसृष्टीतील आईची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. त्यांचं खरं नाव कांता चौहान होतं. 1946 मध्ये ‘अमर राज’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 250 चित्रपटांमध्ये काम केलं. आईच्या भूमिका साकारताना त्यांनी आपल्या अभिनयाची अशी छाप पाडली की पुढे त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘आई’ म्हणूनच लोकप्रिय झाल्या.

1968 मधील ‘राजा और रंक’मधील ‘तू कितनी अच्छी है’ हे गाणं त्यांच्या याच भावनिक भूमिकेचं सुंदर उदाहरण आहे. आजही हे गाणं ऐकलं की आईच्या निस्वार्थ प्रेमाची आणि तिच्या त्यागाची आठवण होते. म्हणूनच अनेक वर्षांनंतरही हे गीत प्रेक्षकांच्या मनात तितकंच जिवंत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us