National Film Awards Winners List: 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी सिनेमांचा दबदबा! वाचा विजेत्यांची यादी

नुकताच आता 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा ही करण्यात आलीये. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांनी या पुरस्कारांमध्ये धमाका केल्याचे बघायला मिळतंय. वाचा विजेत्यांची यादी...

National Film Awards Winners List: 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी सिनेमांचा दबदबा! वाचा विजेत्यांची यादी
71st-national-film-awards
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 01, 2025 | 7:17 PM

सर्वात मानाचा आणि प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकताच घोषणा करण्यात आली आहे. यंदा राष्ट्रीय पुरस्कारांचे 71वे वर्ष होते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान, मराठी कलाकारांनी यंदा चांगली बाजी मारल्याचे दिसत आहे.  सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली? वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

कुठे पार पडतोय पुरस्कार सोहळा?

71वा राष्ट्रीय चित्रपट सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी दिल्लीतील आयोजित करण्यात आला आहे. हा बहुप्रतिक्षित सोहळा आज, १ ऑगस्ट रोजी विज्ञान भवनात पार पडला आहे. या सोहळ्याला मागच्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि सिनेसृष्टीमधील प्रतिभावान लोक उपस्थित होते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची पूर्ण यादी:

  • सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमन
  • सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडू
  • सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म- भागावान्थ केसरी
  • सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पार्किंग
  • सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म- गॉडडे गॉडडे चा
  • सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- श्यामची आई
  • सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कथल
  • सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा- वश
  • सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा- डीप फ्रीजर
  • सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा- हनूमान
  • सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)
  • सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)
  • सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- अॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)
  • सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव
  • सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार- कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- उर्वशी, जानकी बोडीवाला
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल
  • सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा- नाळ २
  • सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक- आशीष भेंडे (आत्मपॅम्फलेट)
  • सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म- 12th फेल

यापूर्वी पार पडलेल्या, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, अभिनेता ऋषभ शेट्टीला कन्नड ब्लॉकबस्टर ‘कांतारा’मधील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नित्या मेनन (‘थिरुचित्रंबलम’) आणि मानसी परेख (‘कच्छ एक्सप्रेस’) यांना विभागून देण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us