पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट..

पूनम पांडे हिच्या विरोधात लोकांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय. लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. पूनम पांडे हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. फक्त पूनम पांडेच नाही तर तिच्या मॅनेजरच्या अडचणी वाढल्या आहेत.

पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट..
| Updated on: Feb 04, 2024 | 1:58 PM

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले गेले. पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताना दिसली. पूनम पांडे हिचे निधन झाल्याचे कळताच बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. फक्त हेच नाही तर अनेक चाहत्यांनी थेट पूनम पांडे हिच्या अंत्यदर्शनासाठी तिच्या मुंबईतील घराकडे धाव घेतली. पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे कळाल्यापासून लोकांमध्ये भितीचे वातावरण हे बघायला मिळाले. मात्र, मोठा संभ्रम देखील बघायला मिळाला.

पूनम पांडे हिने निधनाच्या चर्चांच्या तब्बल 24 तासांनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हे जाहिर केले की, आपण जिवंत आहोत. पूनम पांडे हिचा हा व्हिडीओ पाहून लोकांच्या डोक्यातून मुंग्याच निघाल्या. थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी पूनम पांडे हिचा चांगलाच समाचार घेतला. बऱ्याच लोकांनी पूनम पांडे हिला बिनडोक म्हटले.

पूनम पांडे ही गेल्या काही महिन्यांपासून आपल्या निधनाची प्लनिंग करत असल्याचा हैराण करणारा खुलासा केला. पूनम पांडे हिनेच आपल्या खोट्या निधनाची बातमी पसरवल्याने लोकांनी थेट पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. आता जर हिच्यावर कारवाई केली गेली नाही तर ही पुढे काहीही करू शकते, असे अनेकांचे म्हणणे आले.

आता पूनम पांडे हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. पूनम पांडे हिच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. अभिनेत्री पूनम पांडे विरोधात वकील अली काशिफ खान देशमुख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलीये. हेच नाही तर पूनमच्या मॅनेजरच्या समस्यांमध्येही मोठी वाढ होणार हे स्पष्ट आहे.

आयपीसी सेक्शन 417, 420, 120B, 34 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीये. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पूनम पांडे हिच्यासह तिच्या मॅनेजरच्या समस्या वाढू शकतात. आपल्याच निधनाची खोटी माहिती पसरवल्याने पूनम पांडे हिच्या विरोधात लोकांमध्ये जोरदार संताप हा बघायला मिळतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us