AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe kay karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवं वळण, अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा ट्वि्स्ट

द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अनिरुद्धला आता संजनाशी लग्नही करायचं नाही. अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम निर्माण झाला आहे. (A new twist in the serial 'Aai Kuthe kay karte', a new twist in the life of Arundhati and Sanjana)

Aai Kuthe kay karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवं वळण, अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा ट्वि्स्ट
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 3:55 PM
Share

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe kay karte) ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट घ्यायचा नाहीय. आप्पांकडे त्यानं तसं बोलूनही दाखवलं आहे.

अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम

द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अनिरुद्धला आता संजनाशी लग्नही करायचं नाही. अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम निर्माण झाला आहे. अनिरुद्धच्या या निर्णयाचे नेमके काय पडसाद उमटणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

अंकिताचा खोटारडेपणा उघड होणार !

नुकतंच अनिरुद्धचं दुटप्पी धोरण तर तिकडे अभिषेक आणि अंकिताच्या नात्यातही कडवटपणा पाहायला मिळतोय. अभिषेकनं लग्न करावं म्हणून अंकितानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अंकितानं खरंच आत्महत्येचा निर्णय घेतला होता की नाटक रचलं होतं याचा तपास आता अभिषेक करणार आहे. अंकिताचा खोटारडेपणा उघड झालाच तर तिला घरातून बाहेर निघण्याची सक्त ताकीदही त्याने दिलीय. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे भाग दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहेत. मालिकेतलं हे नवं वळण अनुभवण्यासाठी न चुकता पाहा आई कुठे काय करते स्टार प्रवाहवर.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि तितक्याच ताकदीचे संवाद आणि दिग्दर्शनामुळे मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. नुकतंच या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. ‘सेटवर मी अपूर्वा गोरे आणि गौरी कुलकर्णी म्हणजेच मालिकेतली इशा आणि गौरी आम्ही तिघी न चुकता व्यायाम करतो. योगाच्या आसनांसोबतच निसर्गरम्य वातावरणात तासभर चालणं हे आमचं नित्याचं आहे.’ असं ती म्हणाली.

पुढे ती सांगते, ‘शूटिंग संपलं की आम्ही सर्व एकत्र डिनर करतो. त्यानंतर वॉक हा ठरलेला. शूटिंगमधूनही वेळ काढत हॉटेलच्या रुममध्ये आम्ही ठरवून व्यायाम करतो. लॉकडाऊनमुळे सध्या जिम वैगेरेचा पर्याय नसल्यामुळे उपलब्ध गोष्टींचा सदुपयोग करण्याचा माझा प्रयत्न असतो.दिवसभराच्या गडबडीतून मी स्वत:साठी 1 तास तरी काढते. सध्या सेटवर खूपच आल्हाददायक वातावरण आहे. सेटच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत. त्यामुळे मोकळी हवा आम्ही अनुभवतोय.’

संबंधित बातम्या

Photo : ‘मिलियन डॉलर व्हेगन’ संस्थेने भारतातील गरजूंची भूक भागवली, सनी लिओनीचा विशेष सहभाग

Sonali Bendre: वेळ लवकर निघून जाते… ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ निमित्त सोनाली बेंद्रेची काळजाला हात घालणारी पोस्ट

Mira Rajput : मीरा राजपूतनं शेअर केला शाहिद कपूरचा खास व्हिडीओ, कॅप्शनमध्ये लिहिलं…

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.