Govinda: अखेर वाद संपला! गोविंदा Gfला सोडून पुन्हा पत्नी सुनिता अहुजासोबत? असं काय झालं?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुनिता अहुजा ही गोविंदासोबत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी दोघांमधील वाद मिटला असल्याचे म्हटले आहे.

Govinda: अखेर वाद संपला! गोविंदा Gfला सोडून पुन्हा पत्नी सुनिता अहुजासोबत? असं काय झालं?
Govinda and Sunita
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 8:29 AM

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा हा चांगलाच चर्चेत आहे. त्याचा आगामी सिनेमा रुपा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो कोमल राणी स्वर्णकारसोबत दिसणार आहे. त्यापूर्वी गोविंदा अनेक ठिकाणी कोमलसोबत दिसला. त्यामुळे सुनिता आणि गोविंदामध्ये काही तरी बिनसले असल्याचे समोर आले. सुनिता अहूजा सतत कोमलवर निशाणा साधत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सुनिता आणि गोविंदा पुन्हा एकत्र आल्याचे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदा आणि सुनिता एकत्र असल्याचे दिसत आहे. गोविंदाने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर दुसरीकडे सुनिताने पेस्टल रंगाचा शर्ट आणि प्रिंटेट जीन्स घातली आहे. विमानतळावर ते दोघे एकत्र हातात हात घालून उभे असल्याचे दिसत आहे. तसेच फोटोग्राफर्सला देखील पोज देताना दिसले.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

गोविंदा आणि सुनिताचा विमानतळावरील व्हिडीओ पाहून अनेकांनी ते पुन्हा एकत्र आले असल्याचे म्हटले आहे. चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंट करत, खूप मस्त कपल आहे असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने, जोडी नंबर 1 अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, ते एकत्र एकदम परफेक्ट दिसतात. मला कळत नाही त्यांच्यामध्ये भांडणे का होत आहेत? असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ आताचा आहे की वाद होण्यापूर्वीचा आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लालबागला दिसले एकत्र

गोविंदाने बातमी एजन्सी एएनआयशी बोलताना लालबागचा राजा येथे जाण्याचे कारण सांगितले. अभिनेत्यानुसार, ते त्यांच्या आगामी चित्रपट ‘रूपा’साठी भगवान गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे पोहोचले होते. त्यांनी सांगितले की दीर्घ काळानंतर ते चित्रपटांमध्ये पुन्हा सक्रिय होत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. गोविंदाने आपल्या जुन्या अनुभवांचा उल्लेख करत सांगितले की यापूर्वी ते करिश्मा कपूरसोबत मंदिरात दर्शन घ्यायला गेले होते आणि त्यावेळी त्यांच्या चित्रपटांना यश मिळाले होते. त्यांनी रवीना टंडनसोबतही मंदिरात गेल्याचे सांगितली. आता पुन्हा चित्रपटात परत येण्यापूर्वी तो कोमल राणीसोबत लालबागचा राजा येथे पोहोचला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us