Aamir Khan Movie: आमिर खान बनणार सुपरहिरो ? जुन्या मित्राची मिळाली साथ, दिग्दर्शकही ठरला !

आमिर खान सध्या एका सुपरहिरो फिल्मच्या तयारीत व्यस्त आहे. यात त्याला त्याच्या जुन्या मित्राची देखील साथ मिळू शकते.

Aamir Khan Movie: आमिर खान बनणार सुपरहिरो ? जुन्या मित्राची मिळाली साथ, दिग्दर्शकही ठरला !
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 8:21 PM

Aamir Khan Superhero Movie : बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा बऱ्याच काळापासून ‘ललकारा’ नावाच्या पीरियड स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचं शूटिंग सुरू होईल असं बोललं जात आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची कमान आमिरचा जुना , खास मित्र , दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सांभाळणार आहे. याच दरम्यान आता आणखी एक चित्रपटाशी आमिरचं नाव जोडलं जात असलयाची चर्चा आहे, तो एका सुपरहिरो चित्रपटाच्या तयारीत असल्याचं समजतंय.

बॉलीवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, आमिर खान हा त्याचा जुना मित्र, प्रख्यात फिल्म प्रोड्यसुर साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक आर.बाल्की यांच्यासोबत एका प्रोजेक्टवर चर्चा करतोय. हा प्रोजेक्ट सध्या सुरूवातीच्या स्टेजवर असून त्याचं नावही फायनल झालेलं नाहीये. पण त्यामध्ये आमिरने रस दाखवल्याची माहिती समोर आली आहे.

स्क्रिप्टवर नाव सुरू

या रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर वेगाने काम सुरू आहे. आमिर खान याला अप्रोच करण्यात आलं असून त्याने काम करण्याची तयारी दाखवली आहे. या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड असल्याचे त्यानेच जाहीर केलं आहे. असं असलं तरीही आमिर आणि मेकर्स यांच्यात या चित्रपटाबद्दल कोणत्याही गोष्टी फायनल झालेल्या नाही, वा काही प्रॉमिस करण्यात आलेलं नाही. येत्या काही महिन्यात याबद्दल आणखी चर्चा होऊ शकते. सध्या स्क्रिप्ट आणि फिल्मचं व्हिजन फायनल होण्याची मेकर्स वाट बघत आहेत.

साजिद नाडियाडवाला आणि आमिर खान पहिल्यांदाच एकत्र

आमिर खान एखादा चित्रपट निवडताना अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतो हे तर सर्वश्रुत आहे. स्क्रिप्ट पूर्णपणे तयार आणि अंतिम झाल्यानंतरच तो कोणत्याही प्रोजेक्टला होकार देतात. त्यामुळे सध्या निर्माते आमिरसोबत त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या स्क्रिप्टवर बारकाईने काम करत असल्याचे समजते.

सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं, तर येत्या काळात आमिर खान एका भव्य सुपरहिरो चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान आणि प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून चांगली मैत्री असली, तरी त्या दोघांनी आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी एकत्र काम केलेलं नाही.

दरम्यान, आमिर खानच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. तो ‘3 इडियट्स’च्या बहुप्रतिक्षित सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत शर्मन जोशी आणि आर. माधवन यांची लोकप्रिय त्रिकुटी पुन्हा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी सध्या ‘3 इडियट्स 2’च्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. हिरानी यांनी स्वतः या सिक्वेलची पुष्टी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या भागाची कथा जिथे संपली होती, त्यानंतर तब्बल 15 ते 20 वर्षांनी घडणारी कथा या सिक्वेलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आमिर, शर्मन आणि माधवनला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us