ऐश्वर्याला माझ्या परवानगीची.., पत्नीसाठी अभिषेक बच्चने दिलं असं उत्तर, युजर्सची बोलती बंद!

अभिनेत्री ऐश्वर्या राय लग्नानंतर चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, परंतु त्याचं प्रमाण फार कमी झालं आहे. एकदा एका युजरने यावरून अभिषेकवर टीका केली होती. ऐश्वर्याला अधिकाधिक चित्रपटांमध्ये काम करण्याची परवानगी द्यावी, असं तो म्हणाला असता त्यावर अभिषेकने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

ऐश्वर्याला माझ्या परवानगीची.., पत्नीसाठी अभिषेक बच्चने दिलं असं उत्तर, युजर्सची बोलती बंद!
Abhishek Bachchan and Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 15, 2026 | 8:43 PM

माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून ती मोजकेच परंतु उल्लेखनीय भूमिका साकारत आहे. ऐश्वर्या जेव्हा कधी मोठ्या पडद्यावर येते, तेव्हा तिच्या अभिनयकौशल्याचं नाणं खणखणीत वाजतं. परंतु ती मोजक्याच चित्रपटांमध्ये झळकत असल्याचं तक्रार अनेक चाहत्यांची आहे. चाहते तिला अधिकाधिक चित्रपटांमध्ये पाहू इच्छितात. तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर फक्त ऐश्वर्याचीच चर्चा होती. यामागचं कारण म्हणजे मणीरत्नम दिग्दर्शित बहुचर्चित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यातील ऐश्वर्याच्या कामगिरीचं प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक झालं होतं. त्याचवेळी एका युजरने ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चनला टॅग करत एक कमेंट केली होती.

“आता ऐश्वर्याला आणखी चित्रपट साईन करू दे आणि आराध्याची काळजी तू घे”, अशी कमेंट संबंधित युजरने लिहिली होती. त्यावर अभिषेकने त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. “तिला साईन करू द्या? सर, तिला कोणत्याच गोष्टीसठी माझ्या परवानगीची गरज नाही, विशेषकरून अशा गोष्टी ज्या तिला आवडतात”, अशी प्रतिक्रिया अभिषेकने दिली होती. त्याचं हे उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं.

अभिषेक बच्चनचं उत्तर-

करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटानंतर ऐश्वर्या चित्रपटांमध्ये फार कमी सक्रिय आहे. त्यानंतर ती बॉलिवूडच्या फक्त एक आणि साऊथच्या दोन चित्रपटांमध्ये झळकली होती. ती शेवटची ‘पोन्नियिन सेल्वन 2’मधूनच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या तमिळ चित्रपटात ऐश्वर्याने नंदिनीची भूमिका साकारली होती.

ऐश्वर्या आणि मणिरत्नम यांनी याआधी ‘इरुवर’ आणि ‘रावण’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. “कलाकारांनी माझा नाही तर आधी कथेचा विचार करावा. ते चित्रपटासाठी तारखा देतात, माझ्यासाठी नाही. ऐश्वर्याने याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही पूर्णपणे वेगळी भूमिका आहे”, असं ते म्हणाले होते. ‘पोन्नियिन सेल्वन’च्या पहिल्या भागात काम करताना जवळपास दहा वर्षांनंतर ऐश्वर्याने तमिळ चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं होतं. पोन्नियिन सेल्वन 1 आणि 2 हे चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाले होते.