VIDEO : सलमानच्या ‘दबंग 3’ चित्रपटाचं गाणं लिक

मुंबई : अभिनेता सलमान खान आगामी चित्रपट ‘दबंग 3’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान खान मध्य प्रदेशात पोहचला आहे. इथे सर्वातआधी चित्रपटाच्या टायटल ट्रॅकचं शूटिंग करण्यात येत आहे. मात्र या शूटिंगचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यात सलमान खान डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल …

VIDEO : सलमानच्या ‘दबंग 3’ चित्रपटाचं गाणं लिक

मुंबई : अभिनेता सलमान खान आगामी चित्रपट ‘दबंग 3’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान खान मध्य प्रदेशात पोहचला आहे. इथे सर्वातआधी चित्रपटाच्या टायटल ट्रॅकचं शूटिंग करण्यात येत आहे. मात्र या शूटिंगचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यात सलमान खान डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या चित्रपटातील गाणं हे सर्वात मोठ्या सेटवर शूट करण्यात येणार होते आणि 500 बॅकअप डान्सर घेऊन गाणं तयार करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. या व्हिडीओमध्येही सलमान खान डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#salmankhan snapped in Mandleahar for #dabbang3 by ? #abproductions

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

व्हिडीओमध्ये सलमानसोबत खूप बॅकग्राऊंड डान्सर दिसत आहेत. तसेच पाण्यात साधूही दिसत आहेत. सलमाननेही नुकतेच ट्वीट करत मध्य प्रदेशच्या मंडलेश्वर येथे शूट सुरु असल्याची माहिती दिली होती. मंडलेश्वर इथं सलमान खानचे आजोबा पोलीसमध्ये होते. चित्रपटातही सलमान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 डिसेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सलमानच्या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित होण्याआधीच लिक झाल्यामुळे नक्कीच यावर चित्रपटाच्या टीमकडून संताप व्यक्त केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. याआधीही आतापर्यंत अशा अनेक घटना इतर चित्रपटाबाबत घडल्या आहेत. नवीन चित्रपट प्रदर्शित होताच सर्वत्र व्हायरल होतो. गेल्या काही दिवसात अशा प्रकारांमध्ये वाढ झालेली दिसत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *