वजन ठरलं करिअरमधील अडथळा, देश सोडण्याच्या विचारात होती अभिनेत्री; एका मेसेजने बदललं नशीब

वाढलेल्या वजनामुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळत नव्हते काम. वैतागून अभिनेत्रीने घेतला होता देश सोडण्याचा निर्णय. पण एका मेसेजमुळे अभिनेत्रीचं बदललं नशीब. कोण आहे ती?

वजन ठरलं करिअरमधील अडथळा, देश सोडण्याच्या विचारात होती अभिनेत्री; एका मेसेजने बदललं नशीब
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 26, 2026 | 7:47 PM

अभिनेत्री अंजली आनंदने करण जौहर यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, या चित्रपटात काम मिळवण्याचा तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. नुकतंच फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खान यांच्या व्लॉगमध्ये अंजलीने आपल्या संघर्षाबद्दल अनेक भावनिक खुलासे केले.

अंजलीने सांगितलं की, 2020 हे वर्ष तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ होता. काम मिळत नव्हतं, लॉकडाऊनमुळे परिस्थिती बिकट झाली होती आणि अवघ्या सहा महिन्यांत तिची संपत्ती संपली होती. त्यामुळे तिने अभिनय क्षेत्र सोडण्यासोबतच भारत सोडण्याचाही विचार केला होता.

याच काळात कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचा तिला मेसेज आला. विशेष म्हणजे, यापूर्वी शानू शर्मा अंजलीला अनेकदा वजन कमी करण्याचा सल्ला देत होत्या. अंजलीने सांगितलं की, प्रत्येक भेटीत ‘थोडं वजन कमी कर, मग काही काम करू’ असं तिला सांगितलं जायचं.

एका मेसेजने बदललं नशीब

मात्र, अचानक अंजलीला करण जौहर यांना भेटण्याची संधी मिळाली. ही बातमी ऐकून तिच्या आईलाही विश्वास बसला नव्हता. अंजलीने सांगितलं की, तिच्या आईनेही ‘मोठी आली करण जौहरला भेटायला, ते तुझ्याशी का भेटतील?’ अशा शब्दांत तिची खिल्ली उडवली होती.

पण करण जौहर यांच्या भेटीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. अंजलीच्या फोटो आणि ऑडिशनने करण जौहर प्रभावित झाला आणि तिला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’साठी फायनल करण्यात आलं. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटामुळे अंजलीला मोठ्या पडद्यावर ओळख मिळाली.

मालिकांमध्ये केलंय काम

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अंजली आनंद ही टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती. ‘ढाई किलो प्रेम’, ‘अनटॅग’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. याशिवाय ‘खतरों के खिलाड़ी 13’ आणि ‘झलक दिखला जा 11’ या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.

अंजलीच्या या खुलाशामुळे तिचा बॉलिवूडपर्यंत पोहोचण्याचा प्रवास किती खडतर होता, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us