AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बिकिनी अवतारात मंदिरा बेदीचा योगा, चाहत्यांना दिल्या ऑक्सिजन वाढवण्याच्या टिप्स!

मंदिरा तिच्या चाहत्यांना नेहमी योग वगैरे करण्यास प्रोत्साहित करत असते. आता अभिनेत्री आपल्या व्हिडीओद्वारे ऑक्सिजनची पातळी कशी वाढवायची, हे देखील लोकांना सांगत आहे.

Video | बिकिनी अवतारात मंदिरा बेदीचा योगा, चाहत्यांना दिल्या ऑक्सिजन वाढवण्याच्या टिप्स!
मंदिरा बेदी
| Updated on: May 19, 2021 | 4:56 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या या भयंकर उद्रेकात, प्रत्येकजण एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. सामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत सगळेच लोकांना मदत करण्यात गुंतलेले असतात. या संघर्षात कालकार देखील वेगवेगळ्या प्रकारे गरजूंना मदत करत आहेत. यात काही असेही कलाकार आहेत जे, कोरोनाशी संबंधित प्रत्येक माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत, जे अतिशय आवश्यक आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) सुद्धा या यादीत सामील झाली आहे (Actress Mandira Bedi share hot yoga video tips to boost oxygen level).

अभिनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. मंदिरा अनेकदा फिटनेस संबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. अशा परिस्थितीत आता तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने घरच्या घरी ऑक्सिजनची पातळी कशी वाढवू शकतात, हे सांगितले आहे.

बिकिनीमध्ये मंदिराचा योगा

मंदिरा तिच्या चाहत्यांना नेहमी योग वगैरे करण्यास प्रोत्साहित करत असते. आता अभिनेत्री आपल्या व्हिडीओद्वारे ऑक्सिजनची पातळी कशी वाढवायची, हे देखील लोकांना सांगत आहे. मंदिराचे असे योगा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत, जे चाहत्यांमध्ये खूप पसंत केले जात आहेत.

अशा परिस्थितीत मंदिराचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बिकिनी घालून अर्ध चक्रासन करताना दिसत आहे. चाहत्यांमध्ये अभिनेत्रीची ही शैली खूप लोकप्रिय झाली आहे. व्हिडीओ शेअर करताना मंदिराने कॅप्शनमध्ये लिहिले की, ऑक्सिजनची पातळी वाढवा, आपल्या तणावाची पातळी कमी करा आणि आपली पाठदुखी व खांदे मजबूत करा.’(Actress Mandira Bedi share hot yoga video tips to boost oxygen level)

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

लोकांना मंदिराचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. ते या व्हिडीओवर सतत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. इंस्टाग्रामवर मंदिराचे 1.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

दोन मुलांची आई आहे मंदिरा

फिटनेस फ्रिक अभिनेत्री मंदिरा बेदी दोन मुलांची आई आहे. वयाच्या या टप्प्यावरही ती फिटनेसची विशेष काळजी घेते. मंदिरा बेदी प्रत्येकासाठी एखाद्या फिटनेस आयकॉनपेक्षा कमी नाही. ती नियमितपणे तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करते. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर मंदिराने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या अभिनेत्रीने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, आजही ‘शांती’ मालिकेबद्दल तिचे कौतुक केले जाते. अभिनेत्री आता क्रिकेट कमेंट्री करतानाही दिसते.

(Actress Mandira Bedi share hot yoga video tips to boost oxygen level)

हेही वाचा :

The Family Man 2 Trailer | नव्या पात्रांचा भरणा, श्रीकांतचा नवा जॉब, फॅमिली मॅन 2 चा धमाकेदार ट्रेलर

VIDEO | पाठकबाईंच्या ‘मधाळ’ आवाजाची जादू, अक्षया देवधरचं ‘कभी नीम नीम…’ ऐकलंत?

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.