AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोत्यांच्या ड्रेसमध्ये दिसला नोराचा ‘मधुबाला’वाला लूक, डिझायनर कोण?

नोरा फतेही सोशल मीडियावर ती सातत्याने नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता पुन्हा एकदा नोरा चर्चेत आहे आणि त्याला कारणीभूत ठरला आहे तिचा खास ड्रेस.

मोत्यांच्या ड्रेसमध्ये दिसला नोराचा 'मधुबाला'वाला लूक, डिझायनर कोण?
| Updated on: Jan 22, 2021 | 9:40 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही एक उत्तम बेली डान्सर तर आहेत. त्याचबरोबर ती येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. सोशल मीडियावर ती सातत्याने नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता पुन्हा एकदा नोरा चर्चेत आहे आणि त्याला कारणीभूत ठरला आहे तिचा खास ड्रेस. नोरा फतेहीने या लूकमध्ये एक फोटो आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नोराने मोत्यांचा एख ब्लाऊज घातला आहे, जो खूप सुंदर दिसत आहे. या डिझायनर बिकीनीमध्ये नोराचा लूक एकदम घायाळ करुन सोडणारा आहे.(Actress Nora Fatehi’s pearl dress to the liking of fans)

नोराने आपला हा खास लूक पूर्ण करण्यासाठी आपले केस मोकळे सोडले आहेत. सुप्रिसिद्ध अभिनेत्री मधुबालाच्या लूकमध्ये नोरा खूप सुंदर दिसत आहे. नोराचा हा खास ब्लॅक अॅन्ड व्हाईट अंदाज क्वचितच पाहयला मिळतो.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

हा फोटो शेअर करताना नोराने खास कॅप्शनही दिलं आहे. “प्राचिन भारतीय ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे मोत्याचा जन्म तेवा झाला होता जेव्हा पृथ्वीवरील जल आणि स्वर्गाच्या शक्ती विजेच्या एका बोल्टला टक्क बसली होती. मोती आणि क्रिस्टलची दैवी चमक आणि सादगी, सुंदरतेच्या एका कामुक रचनेला कटोरी वाल्या ब्लाऊजमध्ये जोडतो”. या कॅप्शनसह नोराने डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसलाला टॅग केलं आहे. नोराचा हा लूक पाहून तिचे चाहते खूप खुश आहेत आणि तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा भडीमार पाहायला मिळत आहे.

नोराच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता अजय देवगणसोबत ती एक चित्रपट करत आहे. त्याचं नाव आहे ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’. नोराने 2014 मध्ये ‘Roar-Tigers Of The Sundarbans’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

नोरा फतेहीच्या स्टायलिश हिल्स, किंमत ऐकून व्हाल हैराण!

नोरा तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करत असते. गेल्या काही दिवसांत नोराने बरेच फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. नोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने प्रीटेन्ड ड्रेस घातला आहे आणि यामध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे.

मात्र, या फोटोमध्ये नोराने घातलेल्या स्टायलिश हिल्सची किंमत ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. नोराच्या या स्टायलिश हिल्सची किंमत तब्बल 54,506 रुपये इतकी आहे. नोराने या फोटोत लाईट मेकअप केलेला दिसत आहे. तिने सोन्याची साखळी गळात घातली आहे ज्यामध्ये एक लहान लटकन दिसत आहे. नोराने दिलबर, ओ साकी-साकी, कमरिया यासारख्या हिट गाण्यांमध्ये डान्स केला आहे.

संबंधित बातम्या :

‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीच्या स्टायलिश हिल्स, किंमत ऐकून व्हाल हैराण!

Viral Video | नोरा फतेहीच्या डान्सने चाहते घायाळ, नेटवर फक्त नोरा… नोरा…..!

Actress Nora Fatehi’s pearl dress to the liking of fans

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.