ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा ट्रेडिंग गाण्यावर भन्नाट डान्स, गाणं आहे प्रचंड सुपरहिट
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या जोडीची प्रचंड चर्चा आहे. अशातच त्याचा एका ट्रेडिंग गाण्यावरचा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश नारकर या जोडीचा आवर्जून उल्लेख केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी ही जोडी सध्या सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय आहे. विविध ट्रेंडिंग गाणी आणि व्हायरल ट्रेंडवर रील्स करत ऐश्वर्या-अविनाश आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतात. आता त्यांच्या अशाच एका नव्या डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ हे गाणं इन्स्टाग्राम रील्सवर प्रचंड ट्रेंडिंग आहे. अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स या गाण्यावर रील्स करताना दिसत आहेत. आता या ट्रेंडमध्ये नारकर दाम्पत्यानेही सहभाग घेतला असून, दोघांनी या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दोघांची जबरदस्त एनर्जी आणि डान्समधील उत्साह पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या एका तासात त्याला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. त्यामुळे नारकर दाम्पत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हिडीओला हटके कॅप्शन
ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला ‘जानूची स्प्लेंडर’ असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या भन्नाट रीलवर अभिनेत्री तितीक्षाने ‘कडक…’ अशी कमेंट करत दाद दिली आहे. त्याशिवाय अनेक चाहत्यांनीही कमेंट्सच्या माध्यमातून नारकर दाम्पत्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे.
अविनाश सरांची एनर्जी नेहमीच तुफान असते, ते खूप भारी आहेत, खूप मस्त वाटलं तुम्हाला बघून, लय भारी ताईसाहेब, अप्रतिम डान्स, कमाल, माय फेव्हरेट कपल, मला तुमची जोडी बालपणापासून आवडते, एक नंबर नाईक बाई अशा असंख्य प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांना नारकर कपलचा हा अंदाज चांगलाच आवडला आहे.
‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ हे गाणं निशा गायकवाड यांनी गायलं असून, आशिष शिंदे यांनी त्याला संगीत दिलं आहे. गाण्याच्या भन्नाट तालावर अनेक जण रील्स करत असताना आता ऐश्वर्या-अविनाश यांच्या रीलनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आमच्या लाडक्या नाईक बाई
दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ऐश्वर्या नारकर सध्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. नुकतीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.