Aishwarya Rai : हे सर्व बंद करा.. एअरपोर्टवर येताच पापाराझींवर भडकली ऐश्वर्या राय? पुढे जे घडलं ते पाहून चाहतेही म्हणाले..

Aishwarya Rai: पॅरिसहून मुंबईत परतताच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती पापाराझींना 'आता हे सर्व बंद करा' असं म्हणताना दिसत आहे.

Aishwarya Rai : हे सर्व बंद करा.. एअरपोर्टवर येताच पापाराझींवर भडकली ऐश्वर्या राय? पुढे जे घडलं ते पाहून चाहतेही म्हणाले..
Aishwarya Rai Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 01, 2026 | 7:45 AM

Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होऊन मुंबईत परतली. पॅरिसमध्ये आपल्या ग्लॅमरस अंदाजाने आणि हटके लूकने चर्चेत आलेली ऐश्वर्या मुंबई विमानतळावर येताच पापाराझींनी तिच्याभोवती घोळका केला. मात्र, विमानतळावर तिच्याभोवती फोटोग्राफर्सची गर्दी वाढल्यानंतर ऐश्वर्याने त्यांना एक खास विनंती केली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ऐश्वर्या राय 30 सप्टेंबरच्या पहाटे मुंबई विमानतळावर दिसली. पॅरिस फॅशन वीकमधील उपस्थितीनंतर ती भारतात परतली होती. विमानतळाबाहेर तिचे फोटो टिपण्यासाठी पापाराझी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐश्वर्या कारच्या दिशेने जात असताना फोटोग्राफर्स तिच्या आजूबाजूला जमा झाले. सुरुवातीला तिने हसत त्यांच्याकडे पाहिलं आणि फोटोसाठी पोझही दिली. मात्र, वेगवेगळ्या दिशांनी फोटो काढण्याचा प्रयत्न सुरू झाल्यानंतर तिने पापाराझींना थांबण्याची विनंती केली.

ऐश्वर्याने पापाराझींना, “आओ ग्रुप में… चलिए, ये सब बंद कीजिए,” असं म्हटलं. म्हणजेच, सगळ्यांनी एकत्र येऊन फोटो काढावा, अशी तिची इच्छा होती. विशेष म्हणजे, तिने फोटोग्राफर्सना पूर्णपणे टाळलं नाही. उलट, गर्दी व्यवस्थित झाल्यानंतर ती त्यांच्यासोबत ग्रुप फोटोसाठी उभी राहिली. याशिवाय विमानतळावर उपस्थित चाहत्यांसोबतही तिने फोटो काढले. यंदा पॅरिस फॅशन वीकमधील ऐश्वर्याचा लूक अत्यंत हटके होता. 28 सप्टेंबरला पार पडलेल्या लॉरियल पॅरिसच्या फॅशन शोमध्ये तिने रॅम्प वॉक केला. यावेळी तिने काळ्या रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला होता. तिच्या लालसर-तांबड्या केसांच्या लूकनेही विशेष लक्ष वेधून घेतलं. आयफेल टॉवर आणि लष्करी शाळेच्या पार्श्वभूमीवर प्लेस जॉफ्रे इथं हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता.

Loading...

पहा व्हिडीओ-

पॅरिसमध्ये ऐश्वर्याची भेट ‘ब्रिजर्टन’ फेम अभिनेत्री सिमोन एशले हिच्यासोबतही झाली. दोघी लॉरियलच्या ब्रँड अॅम्बेसेडर्स आहेत. त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पॅरिसमध्ये ग्लॅमरस अवतारात चर्चेत राहिल्यानंतर मुंबई विमानतळावर ऐश्वर्याचा साधा आणि कॅज्युअल लूक पाहायला मिळाला. तिने ओव्हरसाइज्ड ब्लॅक ट्रेंच कोट, टॉप आणि फ्लेअर्ड जीन्स असा लूक केला होता. एअरपोर्टवरील तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून, पापाराझींना केलेली ‘ये सब बंद कीजिए’ ही विनंती सध्या लक्ष वेधून घेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us