AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजय देवगण विंग कमांडरची भूमिका साकारणार

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या देशभक्तीपर सिनेमा ट्रेंडमध्ये आहेत. अभिनेता अक्षय कुमारच बघा, त्याचा दर दुसरा सिनेमा हा देशावर असतो. त्याचा ‘केसरी’ हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. हा सिनेमाही देशभक्तीवर आधारित आहे. त्यातच अभिनेता अजय देवगणचाही कल हा देशभक्तीपर सिनेमांकडे अधिक असतो. लवकरच अशाच एका देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या सिनेमात अजय देवगण दिसणार आहे. हा सिनेमा […]

अजय देवगण विंग कमांडरची भूमिका साकारणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या देशभक्तीपर सिनेमा ट्रेंडमध्ये आहेत. अभिनेता अक्षय कुमारच बघा, त्याचा दर दुसरा सिनेमा हा देशावर असतो. त्याचा ‘केसरी’ हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. हा सिनेमाही देशभक्तीवर आधारित आहे. त्यातच अभिनेता अजय देवगणचाही कल हा देशभक्तीपर सिनेमांकडे अधिक असतो. लवकरच अशाच एका देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या सिनेमात अजय देवगण दिसणार आहे. हा सिनेमा एअरस्ट्राईकवर आधारित आहे. या सिनेमाचं नाव ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ असे असणार आहे.

अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर 2020 मध्ये अजय देवगण त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा डबल डोज घेऊन येत आहे. 2020 मध्ये अजय हा दोन बायेपिकमध्ये दिसणार आहे. अजय फुटबॉल प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांचा बायोपिक करणार आहे, अशी माहिती होती. त्यानंतर आता तो इंडियन एयरफोर्स ऑफिसर विजय कार्णिक यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. 1971 च्या युद्धात विजय कार्णिक यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

सिनेसमीक्षक तरण आदर्शने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. “#BhujThePrideOfIndia मध्ये अजय देवगण. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भूज विमानतळाचे प्रभारी स्कॉर्डन लीडर विजय कार्णिक यांच्या भूमिकेत. अभिषेक दुधईचे दिग्दर्शन, गिन्नी खानुजा, वजीर सिंह, भूषण कुमार, कृष्णा कुमार आणि अभिषेक दुधई यांची निर्मिती.”

अजय देवगण सध्या त्याच्या ‘दे दे प्यार दे’ आणि ‘तानाजी द अनसंग वॉरियर’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो फुटबॉल प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांच्या बायोपिकचं शुटिंग करणार आहे. यादरम्यान किंवा यानंतर तो ‘भुज : द प्रइड ऑफ इंडिया’ या सिनेमाचं शुटिंग सुरु करु शकतो.

‘भुज : द प्रइड ऑफ इंडिया’ मध्ये अजयसोबत कुठली अभिनेत्री असणार आहे, याबाबत सध्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.