AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajmal Kasab : जेवणात दिसायचे किडे, मानसिक संतुलन बिघडलं अन्…अजमल कसाबची काय होती शेवटची इच्छा?

Ajmal Kasab Last Wish : 'प्रहार' हा चित्रपट दहशतवादी अजमल कसाबच्या न्यायालयीन खटल्याची संपूर्ण कथा तपशीलवारपणे मांडतो. कसाब मरणाच्या दारात असताना जवळजवळ वेडा झाला होता. त्याला जेवणात किडे दिसू लागले होते. कसाबची शेवटची इच्छा काय होती? जाणून घ्या.

Ajmal Kasab : जेवणात दिसायचे किडे, मानसिक संतुलन बिघडलं अन्...अजमल कसाबची काय होती शेवटची इच्छा?
| Updated on: Oct 20, 2026 | 7:02 PM
Share

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांवर अनेक चित्रपट बनले आहेत. आता, आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे, पण यावेळी कथा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या दृष्टिकोनातून सांगितली आहे. या हल्ल्यात पकडलेला दहशतवादी अजमल कसाब न्यायालयात कसा चालतो आणि उज्ज्वल निकम त्याला फाशीची शिक्षा कशी मिळवून देतात, हे या चित्रपटात दाखवलं आहे. कसाबचे शेवटचे क्षणही तपशीलवार चित्रित केले आहेत.

‘प्रहार’मध्ये कसाबचं आयुष्य कसं चित्रित केलं आहे?

‘प्रहार’ हा चित्रपट अजमल कसाबचा, त्याच्या अटकेपासून ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवतो. कसाब सुरुवातीला न्यायालयात आपला गुन्हा कबूल करण्यास कसा नकार देतो. तो तरुण असल्याचा दावा करतो आणि बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आल्याचं सांगून दिशाभूल करतो. पण मग, सरकारी वकील उज्ज्वल निकम हळूहळू सत्य उघड करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सवर कसाबनं केलेल्या दहशतीचे साक्षीदार असलेल्यांना न्यायालयात हजर करतात. या चित्रपटात, एक लहान मुलगी कसाबचा खोटेपणा उघड करते. येथूनच कसाब अडकू लागतो आणि एके दिवशी तो अचानक आपला गुन्हे कबूल करतो. पण उज्ज्वल निकम त्याला इतक्या सहजासहजी सोडून देत नाहीत.

चित्रपटात, उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणारा राजकुमार राव म्हणतो की, जोपर्यंत तो कसाबला त्याची चूक लक्षात आणून देत नाही, तोपर्यंत तो त्याला फाशी देणार नाही.

चित्रपटात, कसाब सांगतो की, पाकिस्तानातील त्याच्यासारख्या अनेक गरीब मुलांना भारताचं एक खोटं चित्र दाखवलं जाते. ते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष भडकवतात. कसाबला त्याच्या सर्व मृत साथीदारांचे मृतदेह दाखवले जातात, ज्यांना या आश्वासनासह मुंबईला पाठवण्यात आलं होतं की, मृत्यूनंतर त्यांचे चेहरे उजळतील आणि त्यांच्या शरीरांना गुलाबासारखा सुगंध येईल. हे सगळं पाहून कसाबला उलट्या होऊ लागल्या. त्याच्या मनातील एक मोठा गैरसमज दूर झाला आणि त्यानं मनापासून आपला गुन्हा कबूल केला. अखेरीस, उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे त्याला मृत्युदंड देण्याची विनंती केली.

कसाबची शेवटची इच्छा काय होती?

मृत्यूपूर्वी कसाबचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. तो खात असलेल्या प्रत्येक जेवणात त्याला किडे दिसू लागले. तो पोलिसांवर त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करायचा. पण, हा सर्व एक भ्रम होता. कसाबने आपल्या शेवटच्या इच्छेत कोणतीही विनंती केली नाही, तर फक्त पोलिसांना त्याच्या आईला त्याच्या मृत्यूची बातमी देण्यास सांगितलं. पण, चित्रपटात त्याला मरण्यापूर्वी शेवटची इच्छा म्हणून टोमॅटो खाताना दाखवलं आहे.

दरम्यान, चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, प्रहारमध्ये वामिका गब्बी, सिकंदर खेर, आशिष विद्यार्थी आणि जयदीप अहलावत सारखे कलाकार आहेत. मराठी अभिनेता ललित प्रभाकरनं कसाबची भूमिका केली आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!