AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akanksha Choudhary : मला किडनॅप केलेलं अन्…प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत पुण्यात घडला धक्कादायक प्रकार, सांगितली आपबिती

Akanksha Chaudhary : प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीनं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे.

Akanksha Choudhary : मला किडनॅप केलेलं अन्...प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत पुण्यात घडला धक्कादायक प्रकार, सांगितली आपबिती
| Updated on: Oct 18, 2026 | 2:14 PM
Share

‘लॉक अप २’ ची स्पर्धक आकांक्षा चौधरी नुकतीच एका कार्यक्रमासाठी पुण्यात गेली होती. तिला कार्यक्रमाच्या आयोजकांकडून एक त्रासदायक अनुभव आला. आकांक्षानं आरोप केला आहे की, आयोजकांनी तिचं अपहरण केलं आणि तिला पैसेही दिले नाहीत. तिनं सांगितलं की, आयोजकांनी तिची आशिष नावाच्या एका व्यक्तीची आणि आणखी एका गायिकेची फसवणूक केली.

आकांक्षानं सांगितला धक्कादायक प्रकार

आकांक्षानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर अनेक व्हिडिओ शेअर करून घडलेला प्रकार सांगितला. आकांक्षानं दावा केला की, आयोजकांनी तिला आणि एका मुलीला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं आणि एका मैदानात नेलं. आकांक्षा म्हणाली, ‘जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा समोरच मोठ्या संख्येनं प्रेक्षक होते. माझ्या आणि प्रेक्षकांमध्ये फक्त एक छोटीशी बॅरिकेडिंग होती आणि माझी गाडी अगदी त्यांच्या समोर उभी करण्यात आली होती. इतक्या गर्दीत मी आत जाऊ शकत नाहीये आणि माझी टीमही माझ्यासोबत नाहीये, असं मी ओरडून सांगत होते.’

आयोजकांनी आकांक्षाचं ऐकलं नाही, उलट तिची खिल्ली उडवली. हा संपूर्ण प्रकार एक स्कॅम असल्याचं आकांक्षानं सांगितलं. आशिष नावाच्या व्यक्तीशी आपला संबंध असल्यानं, आपण या इव्हेंटसाठी होकार दिला होता, ज्याचा चुलत भाऊ हा इव्हेंट सांभाळत होता. मात्र, त्यानेही कोणतीही जबाबदारी घेतली नाही, असं आकांक्षानं सांगितलं. ‘मला एक प्रकारे किडनॅपच करण्यात आलं होतं. जेव्हा मी एकाला कानाखाली मारली तेव्हा हा सगळा प्रकार थांबला.’ असंही आकांक्षा पुढे म्हणाली.

आकांक्षाने एक व्हिडिओसुद्धा शेअर केला असून घडलेला प्रकार समोर आणला आहे. तिच्या कारभोवती अनेक लोक जमलेले दिसत आहेत. आकांक्षानं सांगितलं की, ‘त्यांनी जाणीवपूर्वक गर्दीच्या समोर गाडी थांबवली आणि दरवाजा उघडला. इतक्या गर्दीसमोर स्वतःला वाचवण्यासाठी मला कार लॉक करावी लागली. आम्हाला कुठे घेऊन जायचं याबद्दल ते ते मराठीत बोलत होते, पण आम्हाला ते समजलं नाही.’

Follow Us
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो.....
Gokul Elections : गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो, के.पी. पाटील असं का म्हणाले?
अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह.....
Rain Update : अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह ह्या जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात