अक्षय कुमारचं प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अफेअर, बायकोने सोडलेलं घर… दिग्दर्शकाकडून मोठं सत्य अखेर उघड

Akshay Kumar : 2 मुलांचा बाप असताना अक्षय कुमारचं अविवाहित अभिनेत्रीसोबत अफेअर... बायकोला कळताच झालेला मोठा राडा... दिग्दर्शकाकडून अभिनेत्याच्या खासगी आयुष्याचं मोठं सत्य समोर

अक्षय  कुमारचं प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अफेअर, बायकोने सोडलेलं घर... दिग्दर्शकाकडून मोठं सत्य अखेर उघड
| Updated on: Apr 15, 2026 | 11:17 AM

Akshay Kumar : बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील अभिनेता अक्षय कुमार याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. एक काळ असा होता, जेव्हा अक्षय कुमार एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात होता. आज ती अभिनेत्री एका मुलीची आई असून परदेशात आनंदी आयुष्य जगत आहे. पण जेव्हा अक्षयच्या अफेअरबद्दल बायको ट्विंकल खन्ना हिला कळलं होतं, तेव्हा अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात मोठं वादळ आलं होतं. ज्या अभिनेत्रीसोबत अक्षय याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या होत्या, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही, तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे.

प्रियांका आणि अक्षय यांनी ‘अंदाज’, ‘ऐतराज’ आणि ‘वक्त: द रेस अगेंस्ट टाइम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. याचदरम्यान, दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरला आणि याचा परिणाम अभिनेत्या खासगी आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर झाला.

अक्षय आणि प्रियांका यांच्या अफेअरबद्दल दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत मोठी खुलासा केला. ज्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ सिनेमात अभिनेत्री ट्विंकल आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. तर सुनील दर्शन यांनी पुन्हा ‘बरसात’ टायटलसह प्रियांका आणि बॉबी यांना सोबत घेऊन सिनेना बनवला. पण सिनेमात पहिल्यांदा अक्षय कुमारा याला कास्ट करण्यात आलं होतं. सिनेमाचे काही सीन देखील शूट करण्यात आलेले. पण एक वेळ अशी आली जेव्हा अक्षय याच्या खासगी आयुष्यात मोठं वादळ आलं आणि त्याने सिनेमातून माघार घेण्याची विनंती केली. तेव्हा प्रियांका आणि अक्षय याच्या अफेअरच्या चर्चा त्याच्या घरापर्यंत पोहोचल्या होत्या.

यावर सुनील दर्शन म्हणालेला, ‘अशा प्रकरणात त्या व्याक्तीची जबाबदारी अधिक असते, जो विवाहित असतो. इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या लोकांना परिस्थिती कळत असते. पण तरी देखील ते स्वतःच्या मर्यादा ओलांडतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या खासगी आयुष्यावर होते.’

सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकाना यासाठी प्रियांका जबाबदार ठरवलं नाही… सुनील यांचं म्हणणं असं आहे की, ‘प्रत्येक कलाकार आपलं करियर आणि संधी पाहत निर्णय घेत असतो…’, सांगायचं झालं तर, ‘बरसात’ सिनेमातील एक संपूर्ण गाणं अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत शूट झालं होतं. पण अक्षयने सिनेमाला नकार दिल्यानंतर, पुन्हा गाणं शूट बॉबी आणि प्रियांका यांच्यासोबत शूट करण्यात आलं. आज दोन्ही यूट्यूबवर प्रसिद्ध आहेत.

Follow Us