AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लडाखमध्ये मायनस 33 डिग्री तापमान; अमिताभ बच्चन म्हणतात थर्मल सूट घालूनही…

लडाखमध्ये त्यावेळी उणे 33 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. मी थर्मल सूट घातला होता. मात्र, हा सूटही मला थंडीपासून वाचवू शकला नाही. | Amitabh Bachchan

लडाखमध्ये मायनस 33 डिग्री तापमान; अमिताभ बच्चन म्हणतात थर्मल सूट घालूनही...
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Jan 06, 2021 | 8:20 AM
Share

मुंबई: बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ट्विटरवर चांगलेच अ‍ॅक्टिव्ह असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींचे अपडेटस् ते सातत्याने ट्विटवर टाकत असतात. आतादेखील बिग बी यांनी त्यांचा लडाखमधील (Ladakh) एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत अमिताभ बच्चन यांनी थर्मल सूट परिधान केलेला दिसत आहे. (Amitabh Bachchan returns from Ladakh due to minus 33 degrees temperature)

अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे, ते लडाखला गेले होते. मात्र, लडाखमधील हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे अमिताभ बच्चन यांना परतावे लागले. लडाखमध्ये त्यावेळी उणे 33 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. मी थर्मल सूट घातला होता. मात्र, हा सूटही मला थंडीपासून वाचवू शकला नाही, असे अमिताभ यांनी म्हटले आहे.

लडाखमध्ये मायनस 40 डिग्री तापमानात भारतीय सैनिकांचा खडा पहारा

गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. लडाखसारख्या अत्यंत उंचीवर असणाऱ्या दुर्गम प्रदेशात हिवाळ्यात तापमानाचा पारा प्रचंड खाली घसरतो. त्यामुळे हिवाळ्यात येथील वातावरण अत्यंत बिकट असते.

मात्र, चीनच्या धोक्यामुळे या जीवघेण्या थंडीतही भारतीय जवाना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खडा पहारा देत आहेत. सैनिकांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी भारतीय लष्कराने जय्यत तयारी केली आहे. या सैनिकांना खास बनावटीचे थर्मल सूट देण्यात आले आहेत. तसेच सीमेलगत अद्ययावत निवासी स्मार्ट कॅम्प बांधले आहेत. यात वीज, पाणी आणि हिटिंगसारख्या थंडीपासून वाचण्यासाठीच्या मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. या स्मार्ट कॅम्पला आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही दृष्टीने अत्याधुनिक बनवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?

VIDEO: हातोड्याने अंडे फोडले, सुरीने ज्यूस कापला, गोठलेल्या थंडीत जवानांची झुंज

लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था

(Amitabh Bachchan returns from Ladakh due to minus 33 degrees temperature)

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती