ऐश्वर्यापेक्षाही चाहते तिच्यासाठी वेडे; या सुप्ररस्टार अभिनेत्रीने स्वत:ला मारण्याची स्वत:च दिली होती सुपारी; आज 6 मुलांची आई अन्

अशी एक अभिनेत्री जी 6 मुलांची आई आहे, तिला चाकू गोळा करण्याचा छंद आहे, तिने स्वतःला मारण्यासाठी स्वत: सुपारी दिली होती.एवढंच नाही तर तिची एवढी लोकप्रियता आहे की ती सौंदर्याच्याबाबतीत ऐश्वर्यालाही मागे टाकते.

ऐश्वर्यापेक्षाही चाहते तिच्यासाठी वेडे; या सुप्ररस्टार अभिनेत्रीने स्वत:ला मारण्याची स्वत:च दिली होती सुपारी; आज 6 मुलांची आई अन्
angelina jolie
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 08, 2025 | 4:37 PM

बॉलिवूडमध्ये जर सौंदर्यांची वाख्या करायची म्हटलं तर चाहत्यांच्या तोंडी ऐश्वर्या रायचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. पण अशीही एक अभिनेत्री आहे. जिची क्रेझ ऐश्वर्यापेक्षाही दुप्पट आहे. तिच्या सौंदर्यांच्या वर्णन करताना चाहते थकत नाहीत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या अभिनेत्रीला असे काही छंद आहेत ज्यांची कल्पना कोणी करू शकत नाही. या अभिनेत्रीने चक्क स्वत:ला मारण्याची स्वत:च सुपारी दिली होती.

भारतात करोडोने चाहते

तसं पाहायला गेलं तर हॉलिवूड स्टार्सच्या जीवनाबद्दल फार कमी सांगितले जाते. भारतात हॉलिवूड चित्रपट मोठ्या संख्येने पाहिले जातात, परंतु लोकांना तेथील कलाकारांबद्दल फार कमी माहिती असते. अशी एक अभिनेत्री जिचे चाहते फक्त हॉलिवूडमध्येच नाही तर भारतातही करोडोने आहेत. जी 6 मुलांची आई देखील आहे.

ही हॉलिवूड अभिनेत्री म्हणजे अँजेलिना जोली. अँजेलिना जोली हॉलिवूडमधील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अँजेलिना हॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. केवळ सौंदर्यातच नाही तर अभिनय आणि प्रतिभेतही अँजेलिना सर्वांनाच टक्कर देते. भारतातही तिचे करोडो चाहते आहेत. अँजेलिना जोलीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

6 मुलांची आई, करोडोंची संपत्ती अन् तिनवेळा लग्न 

अँजेलिना जोलीने पडद्यावर आपली प्रतिभा दाखवून सर्वांचे मन जिंकलेच, पण तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. वृत्तानुसार, या सुंदरीची संपत्ती 996 कोटी रुपयांची आहे. तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने तीन वेळा लग्न केले आहे आणि तिन्ही लग्ने तुटली आहेत. अँजेलिना जोली 6 मुलांची आई आहे.अलीकडेच, अँजेलिनाने 14 वर्षांनंतर कान्समध्ये पुनरागमन केलं. तिने क्रिस्टल-स्टडेड गाऊनमध्ये रेड कार्पेटवर वर्चस्व गाजवलं. इतकेच नाही तर सौंदर्याचा दुसरा लूक देखील आश्चर्यकारक होता.

शवगृह शास्त्राची आवड

अँजेलिनाबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्या जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल. एका वृत्तानुसार अभिनेत्रीला चाकू गोळा करण्याचा छंद आहे. याशिवाय, तिला शवगृह शास्त्रात म्हणजे mortuary science मध्ये खूप रस आहे. त्यामुळे अँजेलिनाने शवगृह शास्त्राचाही अभ्यास केला आहे.


कामाबद्दल 

अँजेलिनाने वयाच्या 14 व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. तिने 1992 मध्ये तिचे वडील जॉन व्होइट यांच्यासोबत ‘लुकिंग टू गेट आउट’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पडद्यावर पदार्पण केले. इंटरप्टेड 1999 मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

या अभिनेत्रीने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की तिने एकदा स्वत:ला मारण्यासाठी एका खुनीला सुपारी दिली होती. ती 20 वर्षांची असताना तिने हे केले होते. तिने हे केले कारण तिला वाटले की जर तिची हत्या झाली तर तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना स्वतःचा जीव घेण्यापेक्षा दुःख सहन करणे सोपे होईल.