Video | राणादाच्या पाठक बाई म्हणतायत, ‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’, पाहा व्हिडीओ…

मालिका ऑफ एअर गेल्यानंतर ‘अंजली बाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर फिटनेसकडे वळली. सध्या तिचे सोशल मीडियावरील काही व्हिडी खूप चर्चेत आहेत.

Video | राणादाच्या पाठक बाई म्हणतायत, ‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’, पाहा व्हिडीओ...
अक्षया देवधर

मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख. राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील ‘अंजली बाई’ आणि ‘राणा दा’ यांच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाहीये. मालिका ऑफ एअर गेल्यानंतर ‘अंजली बाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर फिटनेसकडे वळली. सध्या तिचे सोशल मीडियावरील काही व्हिडी खूप चर्चेत आहेत (Anjali Bai Fame Actress Akshaya Deodhar share dance video on social media).

अक्षया सध्या स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत असून, जिम ट्रेनिंग आणि व्यायामाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. इतकेच  नव्हे तर या दरम्यान तिने तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. सध्या ती तिच्या मैत्रिणींबरोबर धमाल करताना दिसते. असाच एक व्हिडीओ अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती मैत्रीणींसोबत ‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना? या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

पाहा पाठक बाईंचा धमाल व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

(Anjali Bai Fame Actress Akshaya Deodhar share dance video on social media).

सोशल मीडियावर सक्रिय अक्षया

अक्षया देवधर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना थोडीशी कल्पना दिली होती.

यात व्हिडीओत ती एकदम अत्यंत हटके अंदाजात दिसत होती. एरव्ही पडद्यावर साडी किंवा ड्रेसमध्ये दिसणाऱ्या ‘अंजली बाईं’नी अर्थात अक्षया देवधर या व्हिडिओत पायात हाय हिल्स सॅन्डल घालताना, हातात अंगठी व कानातदेखील ड्रेसला मॅचिंग कानातलं घालताना आणि मेकअप करताना दिसली होती. या लूकमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आणि त्याला लवकरच येतेय! असं कॅप्शन दिलंय (Anjali Bai Fame Actress Akshaya Deodhar share dance video on social media).

लॉकडाऊनचा वेळ सत्कारणी

कोरोना विषाणूमुले जाहीर झालेल्या लॉकडाऊन दरम्यान अक्षया पुण्यात तिच्या घरी कुटुंबीयांसोबत होती. लॉकडाऊनमधील तिच्या वेळापत्रकाबद्दल माहिती सांगणारा एक व्हिडीओ तिने शेअर केला होता. यात ती म्हणाली होती की, ‘सध्या हातात मिळत असलेला वेळ सकारात्मक कामांसाठी घालवायचा प्रयत्न करतेय. कंटाळा, नकारात्मक विचार येऊ नयेत यासाठी ते खूप गरजेचं आहे. मी कधी चित्र काढेन असं मला वाटलं नव्हतं पण लॉकडाऊनमध्ये मी बऱ्यापैकी चित्रकला शिकलेय. तसंच आईकडून अनेक पदार्थ देखील शिकतेय. आम्ही दोघी मिळून किचनमध्ये काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय मी वाचन, टीव्ही, सिनेमे बघणे यात सध्या वेळ घालवतेय.’

(Anjali Bai Fame Actress Akshaya Deodhar share dance video on social media)

हेही वाचा :

PHOTO | श्रुतीची हटके स्टाईल पाहून चाहते म्हणाले, ‘हा तर लस घ्यायचा ड्रेस!’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI