Ankita Lokhande : अंकिता लोखंडेची ‘झी मराठी’च्या मालिकेत एन्ट्री, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Ankita Lokhande Entry In Zee Marathi serial : 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अभिनेत्री अंकिता लोखंडेला 'पवित्र रिश्ता' या मालिकेनं प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अभिनेत्री अनेक शोमध्ये दिसली आहे. अशातच आता अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील मालिकेत दिसणार आहे.
अंकिता लोखंडे झी मराठी वाहिनीवरील 'येतेच आता मी नांदायला' या मालिकेत दिसणार आहे. झी मराठीनं सोशल मीडियावर या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे.
'येतेच आता मी नांदायला' या मालिकेत उषा नाडकर्णी यांनी ठकुबाईची भूमिका साकारली आहे. उषा नाडकर्णी आणि अंकिता यांनी 'पवित्र रिश्ता' या मालिकेत एकत्र काम केलेलं. त्यामुळे आता अंकिता आणि उषा पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
झी मराठीनं शेअर केलेल्या मालिकेच्या प्रोमोमध्ये अंकिता हंडा घेऊन पाणी भरायला नळावर आलेली दिसतेय. तेवढ्यात ठकुबाई येते आणि म्हणते, 'ही कोण नटमोगरी...आमच्या इथे पाणी भरायला आलीये' तेवढ्यात अंकिता म्हणते, 'मी अर्चू...अर्चना'
झी मराठीनं हा प्रोमो शेअर करत, 'आधी नांदलेली सून आता परत येणार, ठकुबाईच्या ठसक्यासमोर तिचा निभाव लागणार का?' असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळे 'येतेच आता मी नांदायला' या मालिकेच्या प्रमोशनसाठी अंकिताची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, 'येतेच आता मी नांदायला' ही मालिका 30 नोव्हेंबर पासून रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेत पूजा बिरारीची मुख्य भूमिका आहे.