‘मी तिच्यासोबत पळूनच गेले असते…’ आशा भोसलेंना आवडायची ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून…

भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले यांचं रविवारी सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे.

मी तिच्यासोबत पळूनच गेले असते... आशा भोसलेंना आवडायची ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून...
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 13, 2026 | 1:38 PM

भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांची मैत्री आणि जोडी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आयकॉनिक जोड्यांपैकी एक मानली जाते. अनेक दशकांपासून या दोघींनी आपल्या कलेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

अलीकडे हेलन यांनी एका मुलाखतीत आशा भोसले यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, आशा जींसोबत त्यांचे अतिशय जवळचे आणि प्रेमळ नाते आहे. त्या नेहमी उत्साही, आनंदी आणि ऊर्जेने भरलेल्या असतात. त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. जी गाण्यांना खास बनवते. हेलन यांनी त्यांच्या दीर्घ मैत्रीच्या आठवणी सांगताना नमूद केले की, आशा भोसले यांच्या गायकीतली एनर्जी आणि शैली ही अप्रतिम आहे. त्यांच्या मते, आशा भोसले या संगीतविश्वातील एक अनमोल रत्न आहेत.

आशा भोसले यांचे हेलनबद्दलचे प्रेमळ वक्तव्य

एका जुन्या मुलाखतीत आशा भोसले यांनी हेलन यांना आपली आवडती अभिनेत्री असल्याचे सांगितले होते. त्यांनी मजेशीर पद्धतीने म्हटले होते की, ‘हेलन इतक्या सुंदर होत्या की त्या खोलीत आल्या की मी गाणे विसरून त्यांच्याकडेच पाहत राहायचे. आणि जर मी मुलगा असते तर त्यांच्या सोबत पळून गेले असते’ असं त्या म्हणाल्या.

हेलन आणि आशा भोसले यांनी एकत्र येऊन हिंदी चित्रपटसृष्टीत 270 हून अधिक गाण्यांमध्ये काम केले आहे. या जोडीने त्या काळातील ग्लॅमर आणि संगीताला एक वेगळी ओळख दिली. आशा भोसले आणि हेलन यांची जोडी ही केवळ गाण्यांपुरती मर्यादित नसून ती मैत्री, कला आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे. त्यांच्या एकत्रित कामगिरीने हिंदी चित्रपटसृष्टीला एक सुवर्णकाळ दिला असून आजही त्यांची गाणी प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

वयाच्या 92 व्या वर्षी निधन

मात्र, आता ही जोडी पुन्हा कधीच बघायला मिळणार नाही. रविवारी सकाळी आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह संगीत क्षेत्रावर देखील शोककळा पसरली आहे. अनेकजण त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.

Follow Us