AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwini Bhave : अभिनेता उत्तम, पण तो माणूस म्हणून….नाना पाटेकरांबद्दल काय म्हणाल्या अश्विनी भावे?

Ashvini Bhave On Nana Patekar : मराठी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी नाना पाटेकर यांच्या निधनावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Ashwini Bhave : अभिनेता उत्तम, पण तो माणूस म्हणून....नाना पाटेकरांबद्दल काय म्हणाल्या अश्विनी भावे?
| Updated on: Oct 10, 2026 | 2:26 PM
Share

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अनेक कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनी नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अशातच आता मराठी अभिनेत्री अश्विनी भावे यांनीही नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत, नाना पाटेकर यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून निघणार नाही, असं अश्विनी भावे म्हणाल्या.

अश्विनी भावे यांची पोस्ट

अश्विनी भावे म्हणाल्या की, ‘नमस्कार मंडळी. आपण सर्वांनीच एक उत्तम अभिनेता, मनस्वी जगणारा एक कलंदर माणूस आणि सामाजिक बांधिलकी कशी निभवावी, याचं उत्तम उदाहरण घालून देणारी असामान्य व्यक्ती गमावली आहे. नानाच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधी भरून निघेल असं मला तरी वाटत नाही. नाटक असो, सिनेमा असो, त्याच्या प्रत्येक भूमिकेवर तुम्ही आम्ही सर्वांनीच भरभरून प्रेम केलं. तो अभिनेता उत्तम होताच, पण तो माणूस म्हणून जगला. तो कायम त्याच्या शर्तींवर जगला.’

‘आपल्या सगळ्यांनाच असं जगावं, अशी इच्छा असते, पण असं जगायला वेगळी हिंमत असावी लागते, जी नानाच्या प्रत्येक कृतीतून दिसते. मैत्री ही भावना असेल, वाङ्मयावरचं प्रेम, नाटकाच्या संहितेवरचं त्याचं प्रेम, सुरांवरचं प्रेम, निसर्गावरचं प्रेम, लष्करातल्या लोकांवर, त्यांच्या हिमतीवर त्यानं केलेलं प्रेम. प्रत्येक गोष्टीत तो दिलदारपणे व्यक्त व्हायचा. तो आपली पोतडी समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी उघडायचा आणि सढळपणे दान करायचा. दान पैशाचं, दान त्याच्या वेळेचं, दान त्याच्या मेहनतीचं असायचं. तो उत्तम माणूस होता, त्याचं मन खूप मोठं होतं.’

‘मला खरंच वाटत नाही की, अशी व्यक्ती पुन्हा होईल. त्याच्या या कलंदरपणातून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे आणि आमच्यासारख्यांना त्याच्यातील अभिनेत्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. नाना तू आम्हा सर्वांनाच जे जे दिलंस, त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद आणि तू जिथे कुठे असशील, तिथे कार्यरतच असशील आणि तिथे तू असंच दिलदारपणे जगत असशील, याची मला खात्री आहे.’ असं अश्विनी यांनी शेवटी म्हटलं आहे.

Follow Us
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं