प्रिती झिंटासोबत अफेअरच्या चर्चा, स्टार क्रिकेटपटूनं इतक्या वर्षांनी सोडलं मौन

अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या पती गुडइनफ आणि जुळ्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता जेव्हा अभिनेत्री स्टार क्रिकेटरसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली होती. दरम्यान, क्रिकेटपटूने त्यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रिती झिंटासोबत अफेअरच्या चर्चा, स्टार क्रिकेटपटूनं इतक्या वर्षांनी सोडलं मौन
Preity Zinta
| Updated on: Aug 04, 2026 | 3:30 PM

अभिनेत्री प्रिती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण आज देखील अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे असते. बॉलिवूडमध्ये एक काळ असा देखील होता, जेव्हा प्रितीचं नाव ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटपटू ब्रेट ली याच्यासोबत जोडण्यात आलं. पण तेव्हा अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं सांगितलं होतं. पण आता ब्रेट ली याने पहिलांदाच प्रिती हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ब्रेट ली याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, आयपीएल दरम्यान, ब्रेट लीचं नाव अनेकदा पंजाब किंग्सची सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटासोबत जोडलं गेलं होतं. अशातच आता ब्रेट लीनं यावर मौन सोडलं आहे. ब्रेट ली एका मुलाखतीत म्हणाला, ‘प्रिती माझी चांगली मैत्रीण आणि मी कधीच कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीला डेट केलं नाही. लोकांना जो विचार करायचा असेल, त्यांना करु द्या… मला त्याची काहीच पर्वा नाही आणि कधी पर्वा वाटली देखील नाही… कारण सत्य काय आहे, ते मला माहिती आहे…’ असं देखील ब्रेट ली म्हणाला.

एवढंच नाही तर, एका मुलाखतीत ब्रेट ली याने प्रीती झिंटासोबतच्या आपल्या मैत्रीचा उल्लेख केला होता. 2011 मध्ये पार पडलेल्या एका मुलाखतीत ब्रेटली म्हणालेला, ‘जेव्हा मी पंजाब किंग्सकडून खेळत होतो, तेव्हा प्रीती झिंटा माझी चांगली मैत्रीण झाली.’, सध्या सर्वत्र प्रिती आणि ब्रेट ली यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

प्रिती झिंटा हिचं लग्न… 

बॉलिवूडची ‘डिंपल क्वीन’ अर्थात अभिनेत्री प्रिती झिंटा आजही अनेकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रितीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र बऱ्याच काळापासून प्रिती चित्रपटांपासून दूर आहे. 2016 मध्ये तिने जिन गुडइनफशी लग्न केलं. प्रिती सध्या पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदात आयुष्य जगतेय. लग्नानंतर ती मोठ्या पडद्यावर परतलीच नाही. मात्र चाहत्यांना आजही तिच्या कमबॅकची प्रतीक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us