AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Avantika Malik : 18 वर्षांची सोबत अन् सगळंच मातीमोल, घटस्फोटाचा निर्णय कोणाचा? इम्रान खानची पत्नी स्पष्टच बोलली, म्हणाली…

Imran Khan Divorce : इम्रान खानची एक्स पत्नी अवंतिका मलिकनं नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.

Avantika Malik : 18 वर्षांची सोबत अन् सगळंच मातीमोल, घटस्फोटाचा निर्णय कोणाचा? इम्रान खानची पत्नी स्पष्टच बोलली, म्हणाली...
| Updated on: Oct 24, 2026 | 8:20 AM
Share

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान सध्या सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याची एक्स पत्नी, अवंतिका मलिकनं त्यांच्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अवंतिकानं सांगितलं की, तिला इम्रानपासून वेगळं व्हायचं नव्हतं. ते नातं संपवण्याचा निर्णय इम्राननं घेतला होता. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अवंतिकानं त्यांच्या नात्यातील चढ-उतार आणि त्यांच्या ब्रेकअपमागील कारणांबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं.

इम्रानच्या एक्स पत्नीचं घटस्फोटाबद्दल वक्तव्य

अवंतिका मलिक सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती आणि तिनं तिच्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल चर्चा केली. घटस्फोट घेण्याचा निर्णय कोणाचा होता? असं विचारलं असता अवंतिकानं ‘इम्रान‘ असं सांगितलं. अवंतिका म्हणाली की, तिनं नातं संपवण्याचा कधीच विचार केला नाही. ती म्हणाली की, जर तिनं नातं सोडलं नसतं, तर तिला त्याचे परिणाम भोगावे लागले असते, पण तरीही तिनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला नसता.

घटस्फोटानंतर झालेल्या त्रासाबद्दल बोलताना अवंतिका म्हणाली की, अनेक वर्षांच्या नात्याचा शेवट म्हणजे एक मोठं नुकसान आहे. ती म्हणाली की, जेव्हा ते वेगळे झाले, तेव्हा जणू काही आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग संपला आहे, असं वाटलं.

इम्रानसोबतच्या तिच्या भेटीबद्दल बोलताना अवंतिका म्हणाली की, ती अवघ्या १९ वर्षांची असताना इम्रान खानला भेटली होती. २०११ मध्ये त्यांचे लग्न झालं. लग्नानंतर त्यांची मुलगी, इमारा, जन्माला आली. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये त्यांचे मार्ग वेगळे झाले. सहा महिन्यांनंतर त्यांच्या घटस्फोटाला कायदेशीर अंतिम स्वरूप देण्यात आलं.

तरुण वयात रिलेशनशिपमध्ये येण्याबद्दल अवंतिका म्हणाली की, त्यावेळी लोकांना हे समजत नाही की, ते स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी देखील जबाबदार असतात. अनेकदा असं वाटतं की, त्यांच्या सर्व आनंदासाठी समोरची व्यक्तीच जबाबदार आहे. तिनं पुढे सांगितलं की, जसजसा वेळ जातो, तसतसं त्यांच्या लक्षात येतं की, नात्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीकडून अवाजवी अपेक्षा ठेवणं हानिकारक ठरू शकतं. अवंतिकाच्या मते, वय आणि अनुभवानुसार नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो.

या पॉडकास्टमध्ये, अवंतिकाने तिच्या लग्नाच्या विघटनामागील कारणांवर चर्चा केली. तिने सांगितले की, त्यांच्या नात्यात अशी कोणतीही एक मोठी घटना घडली नाही ज्यामुळे ते वेगळे झाले. तिचा विश्वास आहे की, एकत्र घालवलेल्या वर्षांमध्ये त्या दोघांकडूनही काही चुका झाल्या असतील. तिने स्पष्ट केले की ती जवळपास १८ वर्षे इम्रानसोबत होती. त्यांनी खूप लहान वयात एकत्र आयुष्य सुरू केले आणि त्यांच्या विशीपासून ते तिशीच्या सुरुवातीपर्यंत अनेक अनुभव एकत्र घेतले.

अवंतिकानं पुढे सांगितलं की, तिनं आणि इम्राननं त्यांचं नातं वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. जेव्हा जेव्हा गोष्टी कठीण झाल्या, तेव्हा त्या दोघांनी पुन्हा प्रयत्न करण्याचा आणि नातं टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा विचार केला. बालपणापासून ते प्रसिद्धी, यश आणि अपयशापर्यंत, त्यांनी आयुष्याचे अनेक टप्पे एकत्र अनुभवले. म्हणूनच, नातं संपल्यामुळे दुःखी असूनही, त्यांना त्यांच्या प्रवास चांगला वाटतो, असंही अवंतिका म्हणाली.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…