'अॅव्हेंजर्स एंडगेम'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, दोन दिवसात तब्बल...

मुंबई : ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाई करत नवीन रेकॉर्ड केले आहेत. आतापर्यंत दोन दिवसांत 100 कोटी रुपये कमाई करण्याचा रेकॉर्ड ‘बाहुबली’ सिनेमाच्या नावावर होता. मात्र हा रेकॉर्ड आता ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सिनेमाने मोडीत काढत फक्त दोन दिवसांत 100 कोटी रुपयांची कमाई केली. सिने समीक्षक तरण आदर्श यांनी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर झालेली कमाई ट्विटरवर शेअर …

'अॅव्हेंजर्स एंडगेम'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, दोन दिवसात तब्बल...

मुंबई : ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाई करत नवीन रेकॉर्ड केले आहेत. आतापर्यंत दोन दिवसांत 100 कोटी रुपये कमाई करण्याचा रेकॉर्ड ‘बाहुबली’ सिनेमाच्या नावावर होता. मात्र हा रेकॉर्ड आता ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सिनेमाने मोडीत काढत फक्त दोन दिवसांत 100 कोटी रुपयांची कमाई केली.

सिने समीक्षक तरण आदर्श यांनी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर झालेली कमाई ट्विटरवर शेअर करत म्हटले, “सिनेमाने दोन दिवसात 100 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात हा सिनेमा 150 कोटी रुपये कमवण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. सिनेमाने शुक्रवारी 53.10 कोटी, शनिवारी 51.40 कोटी रुपयांची कमाई करत एकूण 104.50 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाचा एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 124.40 कोटी आहे”.

पहिल्या आठवड्यात 150 कोटी रुपयांची कमाई होणार आहे. आतापर्यंत कोणत्याही हिंदी सिनेमाने हा रेकॉर्ड केला नाही. दोनवर्षापूर्वी ही क्रेझ बाहुबली सिनेमासाठी दिसत होती, असं तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

भारतातील बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करण्याचा रेकॉर्ड अभिनेता आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सिनेनाच्या नावावर होता. ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 52.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.

भारतात सध्या अॅव्हेंजर्स एंडगेम सिनेमाची क्रेझ लोकांमध्ये आहे. मंगळवारी या सिनेमाने अँडव्हान्स तिकिट विक्री करत सर्व रेकॉर्ड तोडले. अॅव्हेंजर्स एंडगेम सिनेमा अॅव्हेंजर्स सीरीजमधील शेवटचा सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा कॅप्टन मार्व्हल नंतर प्रदर्शित झाला आहे. कॅप्टन मार्व्हल गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *