Udta Teer New Release Date : आयुष्मान-साराचा ‘उडता तीर’ पुन्हा पोस्टपोन, कधी रिलीज होणार चित्रपट ?
Udta Teer New Release Date : आयुष्मान खुराना आणि सारा अली खानचा 'उड़ता तीर' हा आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी वाट पहावी लागू शकते. फिल्मची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Udta Teer New Release Date : आयुष्मान खुराना और सारा अली खान यांचा ‘उडता तीर’ हा चितत्रपट सतत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून पिक्चर कधी रिलीज होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र त्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे, कारण चित्रपटाची रिलीज डेट आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. हो, हे खरं, पिक्चरच्या प्रदर्शनाची तारीख दुसऱ्यांदा पोस्टपोन करण्यात आली आहे. आधी 9 ऑक्टोबरला पिक्चर रिलीज होणार होता, मात्र आता तो आणखी पुढे ढकलण्यात आला आहे.
याआधी ’उड़ता तीर’ 11 सप्टेंबरला थिएटरमध्ये येणार होता. त्यानंतर रिलीज डेट बदलून 9 ऑक्टोबर करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा त्यात बदल करण्यात आला असून तारीख आणखी पुढे ढकलण्यात आली. आता हा पिक्चर नेमका कधी रिलीज होणार आहे ? कोणत्या कारणामुळे तो पुढे ढकलण्यात आला ?
कधी रिलीज होणार ‘उड़ता तीर’ चित्रपट
मिळालेल्या माहितीनुसार, ‘उडता तीर’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलून 23 ऑक्टोबर करण्यात आली आहे. आधी ही फिल्म 9 ऑक्टोबरला रिलीज होणार होती, आता मात्र ह्या 15 दिवसानंतर पिक्चर रिलीज होईल. खरंतर, 9 ऑक्टोबरला अनेक चित्रपट रिलीज होत आहेत, ज्यात भारताची अधिकृत ऑस्कर 2027 एन्ट्री ‘गोंधळ’ चाही समावेश आहे. ह्याच तारखेपासून त्याचं एक्सक्लुझिव प्रिव्ह्यू स्क्रीनिंग सुरू होणार आहे. म्हणूनच चित्रपटांमधील ताण टाळण्यासाठी ‘उडता तीर’च्या मेकर्सनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
फिल्मचं शूटिंग थांबवलं होतं ?
रिपोर्ट्सनुसार, ‘उड़ता तीर’ चित्रपटाचं शूटिंग 2024 साली सुरू झालं, पण नंतर ते थांबवण्यात आलं होतं. चित्रपटाचं पहिला शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर ते थांबवण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तरीही, 2026 च्या सुरुवातीस चित्रपटावर पुन्हा काम सुरू झालं. फेब्रुवारीत आयुष्मान आणि साराने मुंबईत चित्रपटाचा एक मोठं शेड्यूल शूट केला होतं, ज्यामध्ये एका मोठ्या गाण्याचा सीनही होता, असं सांगण्यात आलं.
काय आहे कहाणी ?
आयुष्मान खुराना आणि सारा अली खान याच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. चित्रपटात एका पाकिस्तानच्या गुप्तहेराची गोष्ट दाखविली जाणार आहे. हा गुप्तहेर भारतात प्रवेश करतो आणि एका अपघातात अडकतो. या अपघातानंतर त्याची स्मृती हरवते आणि तो स्वतःला भारतीय समजायला लागतो. त्यानंतर तो भारतामधला एक कट्टर देशभक्त बनतो.हा चित्रपट करण जोहर, अपूर्व मेहता, आदर पूनावाला, गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी प्रोड्यूस केला आहे.