AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Controversy | ‘बबिता जीं’च्या अडचणी आणखी वाढल्या, ‘तो’ वादग्रस्त शब्द वापरल्याने FIR दाखल!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ऊर्फ ‘बबीता जी’ हिच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अभिनेत्रीला व्हिडीओ बनवताना जातीवाचक शब्दाचा वापर करणे, खूपच महागात पडले आहे.

Controversy | ‘बबिता जीं’च्या अडचणी आणखी वाढल्या, ‘तो’ वादग्रस्त शब्द वापरल्याने FIR दाखल!
मुनमुन दत्ता
| Updated on: May 29, 2021 | 1:39 PM
Share

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ऊर्फ ‘बबीता जी’ हिच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अभिनेत्रीला व्हिडीओ बनवताना जातीवाचक शब्दाचा वापर करणे, खूपच महागात पडले आहे. अंधेरीच्या अंबोली पोलिस ठाण्यात कलम 295अ अन्वये मुनमुनविरोधात अनुसूचित जाती / जमाती कायद्यानुसार 26 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर कित्येक दिवसांपासून अभिनेत्रीबद्दल बरीच खळबळ उडाली होती, त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे (Babita Ji Controversy FIR register against actress Munmun Dutta).

दरम्यान, मुनमुनने एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांकडे माफी मागितली होती. पण आता तिचा काहीच परिणाम झालेला दिसत नाहीय. अभिनेत्रीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, “माझी ही पोस्ट मी नुकत्याच पोस्ट केलेल्या माझ्या व्हिडीओबद्दल आहे. जिथे मी चुकून चुकीचा शब्द वापरला होता. मी कोणाचा अपमान करू इच्छित नाही किंवा कोणाच्या भावना दुखावू इच्छित नाही. या कारणास्तव मी दिलगीरी व्यक्त करत आहे.”

दुखावलेल्या प्रत्येक व्यक्तीची मागितली माफी

त्यांच्या पोस्टमध्ये मुनमुन पुढे म्हणाली, ‘नंतर मला त्याचा अर्थ कळला आणि मी लगेच तो भाग काढून टाकला. मला प्रत्येक जाती, वंशाच्या किंवा लिंगातील प्रत्येक व्यक्तीबद्दल अत्यंत आदर आहे आणि मी आपल्या समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांच्या अपार योगदानाची कबुली देतो. या शब्दाच्या वापरामुळे अनवधानाने दुखावले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची मला मनापासून मागायची आहे आणि त्याबद्दल मला खूप वाईट वाटले आहे.’

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काही काळापूर्वी मुनमुनने आपल्या एका व्हिडीओमध्ये विशिष्ट जातीबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि बर्‍याच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या अभिनेत्रीविरोधात संताप व्यक्त करत, तिला अटक करण्याची मागणी केली होती (Babita Ji Controversy FIR register against actress Munmun Dutta).

या आधी मुनमुनविरोधात पौरी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय युवा कोळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी ही तक्रार दिली असून, अभिनेत्रीविरोधात कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आमचा अपमान करण्याचा प्रयत्न

नॅशनल अलायंस फॉर दलित हुमन राइट्सचे संयोजक रजत कलसन म्हणाले की, “अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि तिने केवळ आम्हाला नीचा दाखवण्यासाठी असे म्हटले आहे.” मुनमुनविरोधात ज्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते सर्व कलम अजामीनपात्र आहेत आणि या कलमांमध्ये अटकपूर्व जामिनाची देखील तरतूद नाही.’

मुनमुन मागील 13 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा एक महत्त्वाचा भाग आहे. ती या शोमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. तिचे पात्र लोक चांगलेच पसंत करत आहेत. ज्यामुळे ती देशातील घराघरांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे.

(Babita Ji Controversy FIR register against actress Munmun Dutta)

हेही वाचा :

PHOTO | अवघ्या तीन महिन्यांचा ‘हा’ स्टारकिड इन्स्टाग्रामवर सक्रिय, फॉलोअर्सच्याबाबतीत बड्या कलाकारांना देतोय टक्कर!

TMKOC | रिअल लाईफ ‘जेठालाल’-‘टप्पू’मध्ये वाद? दिलीप जोशींनी उचलले मोठे पाऊल!

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.